खर्डा येथील जामखेड रस्त्यावरील हॉटेलमध्ये मालकासोबत झालेल्या वादामुळे मालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून काम करणाऱया तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह विहिरीत टाकला.
याप्रकरणी खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीला अटक केली आहे. तर दोन आरोपी फरार आहेत.
अनिकेत उदमले (वय 25, रा. आडगाव, ता. पाथर्डी) असे मृताचे नाव आहे. अक्षय कातोरे (रा. खर्डा, ता. जामखेड), भरत आगलावे (रा. ब्रह्मगाव, ता. आष्टी), शुभम येकडे (रा. बुलढाणा) अशी आरोपींची नावे आहेत. संजय उदमले (वय 48, रा. आडगाव, ता. पाथर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. अनिकेत हा अक्षय कातोरेच्या हॉटेलमध्ये कामाला होता. दोन दिवसांपूर्वी् अनिकेतचे मालकासोबत भांडण झाले होते. या रागातून वरील आरोपींनी त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. यामध्ये अनिकेतचा मृत्यू झाला होता.
0 Comments