Pandharpur : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी हरिषदादा गायकवाड तर उपसभापतिपदी राजुबापू गावडे

 Pandharpur Live News : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी चळे येथील परिचारक गटाचे कट्टर समर्थक हरिष गायकवाड यांची, तर उपसभापतिपदी पुळूज येथील राजू गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


पंढरपूर बाजार समितीच्या १९९० च्या निवडणुकीत परिचारक गट पहिल्यांदाच उतरला होता. त्या गटाकडून हरिष गायकवाड यांचे वडील भास्करअप्पा गायकवाड हे संचालक म्हणून निवडून आले होते. त्यावेळी सभापतीच्या निवडणुकीत भास्करअप्पा गायकवाड आणि विरोधकांना प्रत्येकी आठ मते मिळाली होती. त्या निवडणुकीत चिठ्ठीवर भास्करआप्पा गायकवाड यांचा पराभव झाला होता. मात्र, त्यांचे स्वप्न हरिष गायकवाड यांनी पूर्ण केले आहे.

निवडीनंतर नूतन सभापती आणि उपसभापतींचा माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सभापती आणि उपसभापती निवडीसाठी सहाय्यक निबंधक डॉ. वैशाली साळवे यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या सभागृहात सर्व सदस्यांची विशेष सभा बोलवण्यात आली होती. यामध्ये सभापतिपदी हरीष गायकवाड, तर उपसभापतिपदी राजू गावडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे वैशाली साळवे यांनी जाहीर केले.

यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी नवनिर्वाचीत सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या. प्रशांत परिचारक यांनी आमच्यावर टाकलेली जबाबदारी निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडून बाजार समितीचा नावलौकिक वाढवू, अशी ग्वाही दिली.

यावेळी माजी सभापती दिलीप घाडगे, माजी उपसभापती लक्ष्मणराव धनवडे, सुभाष मस्के यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी ‌आमदार प्रशांत परिचारक , युटोपीयन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक, युवानेते प्रणव परिचारक, बाजार समितीचे माजी सभापती, दिलीप घाडगे, पोपटराव रेडे, माजी उपसभापती विवेक कचरे, संतोष घोडके, लक्ष्मण धनवडे, वामन माने, तानाजी वाघमोडे, भैरू वाघमारे, सुभाष माने, बाळासाहेब देशमुख आदींसह नूतन सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments