खळबळजनक: मंगळवेढ्यात दबा धरुन बसलेल्या तरुणाला संशयितास अटक ; कोयता व सुरी हस्तगत

 

मंगळवेढा शहरालगतच्या मार्केट यार्डातील झाडाच्या आडोशाला कोयता व सुरी बाळगून दबा धरून बसलेल्या विशाल उर्फ भैया अरुण हजारे (वय रा.हजारे गल्ली, मंगळवेढा)


या युवकास मंगळवेढा पोलिसांच्या रात्रग्रस्त पथकाने अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल अजित मिसाळ यांनी दिली. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास रात्रगस्त पथकाने संशयितास ताब्यात घेतले.

याबाबत सविस्तर माहिती अशी, अमावस्या असल्यामुळे गुरुवारी मध्य रात्री ऑल आउट ऑपरेशन राबवण्यात आले होते.

पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्या सोबत कर्मचारी शहरात व ग्रामीण भागात अवैध शस्त्रे बाळगणारे व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना मार्केट यार्डजवळ संशियातास पथकाने पकडले.

आरोपी विशाल हजारे याच्याकडे सुरी व कोयता आढळला. पोलिस हेडकॉन्स्टेबल हजरत पठाण यांनी त्याला ताब्यात घेतले.

Post a Comment

0 Comments