पंढरपूर: अंत्यविधी उरकून येताना काळाचा घाला ; एकाच कुटुंबातील 3 महिलांचा जागीच मृत्यू

 

अंत्यविधी उरकून घराकडे परतत असतानाजमावामध्ये ट्रक घुसून अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.


ही दुर्दैवी घटना पंढरपूर पासून जवळ असलेल्या टेंभुर्णी रोडवरील टाकळी पुनर्वसन गावानजीक रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

गुनदेव गुटाळ यांचे शुक्रवारी रात्री मृत्यू झाला होता. सर्व नातेवाईक त्यांच्या अत्यंविधीसाठी गेले होते. रात्री उशिरा अत्यंविधी उरकून सर्वजण घराकडे परत येत असताना अचानक टेंभुर्णीहून पंढरपूर कडे येणारा मालवाहू ट्रक अचानक गर्दीत घुसला. 

यामध्ये एकाच कुटुंबातील ३ महिलांचा जागीच मृत्यू झाला तर इतर सहा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हिराबाई भारत गुटाळ (वय 35) मुक्ताबाई गोरख गुटाळ (वय 40 ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असू. तिसऱ्या महिलेचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. या दुदैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

दुचाकी अपघातात बँक मॅनेजरचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरमधून एक मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. दुचाकीच्या अपघातात एका मॅनेजरचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात घटना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड-भराडी रस्त्यावरील पाबळवाडी शिवारात झाला आहे.

नामदेव रायभान पवार असे मृताचे व्यक्तीचे नाव आहे. ते सिल्लोड येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. सिल्लोड शहर पोलीस स्टेशनला या घटनेची नोंद करण्यात आली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments