Pandharpur live : पुणे सातारा महामार्गावर खेडशिवापुर टोल नाका येथे एका आयशर टेम्पोतून ७० लाखाचा गुटखा राजगड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
भोर : पुणे सातारा महामार्गावर खेडशिवापुर टोल नाका येथे एका आयशर टेम्पोतून ७० लाखाचा गुटखा राजगड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.नामदेव मधूकर लवटे (वय २८ वर्षे रा.निजामपूर ता.सांगोला, जि.सोलापूर),चेतन दत्तात्रय खांडेकर (वय १९ वर्षे, धंदा टान्सपोर्ट, राहणार दत्त मंदिरा जवळ, सुतारदरा,कोथरुड, पुणे, मूळ रा.निजामपूर, ता.सांगोला, जि.सोलापूर) असे गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींची नावे असुन या दोन आरोपींना राजगड पोलिसांनी अटक केली आहे. तर गुटख्याचा पुरवठा करणारे शकीर निसार अलीमटटी (राहणार विजापूर, कर्नाटक) व सददाम मेहबुब कोतवाल (रा.मंगोली, विजापूर कर्नाटक) या दोघांनी गुटखा पुरवल्याबद्दल त्यांच्यावर राजगड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक लाल रंगाचा आयशर टेम्पो (एम एच ११, सी जे ४०७५) कर्नाटक मधून येणार असल्याची खबर राजगड पोलिसांना मिळाली यानुसार सापळा रचून हा संशयित आयशर टेम्पो राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आला असता पोलिसांनी टेम्पोचा पाठलाग केला. सदरचा टेम्पो खेड शिवापुर टोल नाक्यावर आला असता पोलिसांनी ७० लाखाच्या गुटख्यासहित टेम्पो पकडून जप्त केला.
सदरची कारवाई राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पोलीस उपनिरीक्षक नितीन खामगळ, पो.हवालदार महेश खरात, राहुल कोल्हे, पो. नाईक राहुल किर्वे, गणेश लडकत महीला पोलीस हवालदार प्रमिला निकम यांनी केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे हे करीत आहेत.सदर कारवाईची फिर्याद बालाजी औंदुबर शिंदे अन्न सुरक्षाअधिकारी यांनी दिली आहे.
0 Comments