Nagpur Crime | डॉक्टरला खंडणी मागणारे दोन आरोपी गजाआड; एक वेब डेव्हलपर, तर दुसरा वसुली एजंट

  

Pandharpur  live : डॉक्टर क्टरला जिवे मारण्याची धमकी (Threaten to Kill) देऊन 40 लाख रुपयांची खंडणी (Extortion of 40 Lakhs) मागणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली.

आरोपींपैकी एक वेब डेव्हलपर तर, दुसरा फायनान्स कंपनीसाठी वसुलीचे काम करतो. दोघांचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. त्यांनी झटपट पैसे कमावण्याच्या नादात आरोपींनी डॉक्टरला धमकावण्याची योजना बनवली.

नागपूर : डॉक्टरला जिवे मारण्याची धमकी (Threaten to Kill) देऊन 40 लाख रुपयांची खंडणी (Extortion of 40 Lakhs) मागणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. आरोपींपैकी एक वेब डेव्हलपर तर, दुसरा फायनान्स कंपनीसाठी वसुलीचे काम करतो. दोघांचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. त्यांनी झटपट पैसे कमावण्याच्या नादात आरोपींनी डॉक्टरला धमकावण्याची योजना बनवली.

हर्षद नरेंद्र हटवार (वय 32 रा. मनीषनगर) आणि शुभम संजय मडावी (वय 29 रा. तकिया, धंतोली) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी डॉ. सुनील मोतिराम लांजेवार (65 रा. रामदासपेठ) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला होता.

डॉ. लांजेवार यांचे जनता चौकातील श्रीमान कॉम्प्लेक्समध्ये दादासाहेब लांजेवार रुग्णालय आहे. त्यांची पत्नी छाया सुनील लांजेवार (वय 64) या सुद्धा डॉक्टर आहेत. गेल्या मंगळवारी आरोपींनी त्यांना व्हॉट्सअॅप कॉल केला होता. रुग्णालय चालवायचा असेल तर 40 लाख रुपये 'वन टाईम प्रोटेक्शन मनी' द्यावी लागेल. जर पैसे मिळाले नाहीतर जीवानिशी ठार मारू. तसेच याबाबत पोलिसांना सांगितले तर परिणाम भोगावे लागतील', अशी धमकी दिली. लांजेवार यांनी पोलिसात तक्रार केली. सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा नोंदवून लांजेवार दाम्पत्याला सुरक्षा पुरवली. डीसीपी अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात खंडणी विरोधी पथकाने घटनेचा तपास सुरू केला.

इंटरनेटवरून काढले डॉक्टरांचे नंबर

दरम्यान, शनिवारी दोन्ही आरोपी जनता चौकातील एका पानठेल्यावर असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ तेथे पोहोचून दोघांनाही अटक केली. हर्षद सॉफ्टवेअर आणि वेब डेव्हलपर असून, एका कंपनीत काम करतो. शुभमही फायनांस कंपनीत वसुलीचे काम करतो. शुभमला परिसरातील रुग्णालय आणि डॉक्टरांची माहिती होती. झटपट पैसे कमावण्याच्या लालसेत दोघांनीही इंटरनेटवरून डॉक्टरांचे नंबर काढले. 2-3 डॉक्टरांना फोन केला. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आरोपींनी लांजेवार यांना कॉल केला असता त्यांनी फोन उचलला.


Post a Comment

0 Comments