पंढरपूर/प्रतीनीधी
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आ. समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरीत कार्यकर्त्यांनी विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविले होते. या कार्यक्रमामध्ये आदर्श आश्रम शाळा येथे विद्यार्थ्यांना दप्तर वाटप, शहीद कुनालगिर गोसावी अंध शाळा येथे मिष्टान्न भोजन वाटप करण्यात आले. यावेळी येथील विद्यार्थ्यांना पंढरीतील अध्यात्मिक गुरू तात्या महाराज साळुंखे यांनी मौलिक मार्गदर्शन केले. शिक्षणाचे महत्व विषद करताना तात्या महाराज म्हणाले की, आधुनिक पध्दतीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कला गुणांना जपणे आवश्यक आहे. शिक्षणासोबतच आपल्या राष्ट्राची आदर्शवत असलेली अध्यात्मिक संस्कृतीही जपली पाहिजे. शिक्षणाची आणि सुसंस्कारांची सांगड जोडत भावी पिढीला मजबुत करणं ही काळाची गरज बनली आहे. असे प्रतिपादन यावेळी तात्या महाराज साळुंखे यांनी केले.
यावेळी मातोश्री वृद्धाश्रम येथे फळे वाटप, गोपाळनाथ गोशाळा, गोपाळपूर येथे गाईना चारा वाटप, गरजूंना ब्ल्याकेट वाटप इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले, या कार्यक्रमाचे आयोजन, समर्थक कार्यकर्ते राहुल गावडे, गणेश दादा शिंदे नाईक, पांडुरंग वाडेकर यांनी आयोजित केले होते.
..,...............
बघा मराठी बातमी २४ तास या आमच्या नव्या कोऱ्या युट्युब न्युज चॅनल वरील आजच्या बातम्यांचे व्हिडिओ
...........................
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे बेस्ट सभापती श्री.सोमनाथ आवताडे हे होते.सदरचा कार्यक्रम सुधीर उर्फ तात्या महाराज साळुंखे,नानासाहेब करकमकर,महेश मोटे, नगरसेक डी राज सर्वगोड, नगरसेवक भैया, सोनवणे,अमित कसबे,ad संदीप कागदे सर, यांच्या शुभहस्ते करण्यात आले या वेळी, संजय लवटे सर,सारंग कुंभार, भाऊसाहेब शिंडे नाईक,महेश कुंभार, सचिन आदमाने, धीरज साळुंखे, सोमेश परचंडे, निलेश जाधव रवींद्र सुर्वे, गोरख पांढरे, बापू साहेब घोडके, भास्कर घायाळ, प्रथमेश बागल, अनिकेत देशमुख अभिजित मोरे, आदी मान्यवर शिक्षक वृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री राहुल गावडे यांनी केले.
0 Comments