महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर येथे सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे. येथील अधिवेशनावर धनगर समाजाच्या आरक्षण बचावासाठी तारीख ११ डिसेंबर रोजी ओबीसीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात सामील झालेले परभणी जिल्ह्याच्या पालम तालूक्यातील सरफराजपूर येथील ओबीसी बांधव आपल्या वाहनातून मोर्चा संपल्यानंतर गावी वापस येत असताना नांदेड जिल्ह्यातील श्रिक्षेत्र रेणूका देवीच्या माहूरजवळ येता त्यांच्या गाडीला मागून येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली.
या भिषण स्वरुपाच्या मोटार अपघातात सरफराजपूर येथील आंदोलनकर्ते रमेश दत्तराव वाघमारे,लक्ष्मण पंडीतराव वाघमारे हे ठार झाले तर राम बालाजी बनसोडे, रंगराव संपतराव वाघमारे, बापूराव मारोती वाघमारे हे तिघेजण गंभीररित्या जखमी झाले असल्याची माहिती उघड झाली असून या घटनेमुळे पालमच्या सरफराजपूर गावावर शोककळा पसरली आहे.
पंढरपुर लाईव्ह न्यूजसाठी प्रतिनिधि आनंद ढोणे पाटील परभणी.
0 Comments