Mangalavedha : मंगळवेढा येथील पहिल्या मराठा कुणबी जात प्रमाणपत्राचे आमदार आवताडे यांच्या हस्ते वितरण

 


मंगळवेढा (प्रतिनिधी):  मराठा आरक्षण अनुषंगाने मंगळवेढा तालुक्यातील पहिल्या मराठा कुणबी जातीच्या प्रमाणपत्राचे वितरण पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा आवताडे यांच्या हस्ते व प्रांताधिकारी बी.आर.माळी व तहसीलदार मदन जाधव यांच्या उपस्थितीमध्ये आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे घुले परिवाराकडे करण्यात आले.

खालील लिंक वर क्लिक करून पंढरपूर लाईव्ह न्युज चे व्हाट्सअप चॅनल जॉईन करा

Follow the Pandharpur Live News channel on WhatsApp:





सदर प्रसंगी घुले परिवारातील आस्था मनोहर घुले, जयदेव मनोहर घुले व ओमराजे मनोहर घुले यांना या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. शिक्षण आणि नोकरी या क्षेत्रामध्ये मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी गल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे लढा सुरू आहे.

नुकत्याच संपन्न झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार महोदय यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली होती. पद आणि प्रतिष्ठा यापेक्षा मराठा समाजाची आरक्षण दाहकता माझ्यासाठी महत्त्वपूर्ण असल्यामुळे समाजाच्या या लढाईमध्ये मी नेहमीच समाज बांधवांच्या बरोबरीने असेन असा शब्द आमदार आवताडे यांनी यावेळी दिला.

Post a Comment

0 Comments