Pandharpur Live News: कॉंग्रेस च्पा पंढरपूर शहर सोशल मीडिया अध्यक्ष पदी महेश अधटराव यांची निवड


Pandharpur Live News: कॉंग्रेस च्पा पंढरपूर शहर सोशल मीडिया अध्यक्ष पदी महेश अधटराव यांची निवड करण्यात आली आहे. कॉंग्रेस च्पा जिल्हा उपाध्यक्ष सुनेत्रा ताई पवार व सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष.सचीन खैरे पाटील यांच्या हस्ते नुकतेच त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस किशोर जाधव, सेवादल शहराध्यक्ष गणेश माने, शहर उपाध्यक्ष सागर कदम, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष शकील रत्नपारखी,  काँग्रेसचे माढा लोकसभा समन्वयक अजय अदाटे व गायकवाड  तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न करीन अशी प्रतिक्रिया यावेळी नुतन सोशल मिडीया अध्यक्ष महेश अधटराव यांनी दिली.

Post a Comment

0 Comments