Pandharpur Live News: गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग असलेले पंढरपूरचे समाजसेवक तथा लायन्स क्लब चे सचिव ओंकार बसवंती यांची शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष सोलापूर जिल्हा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.
ॲड.अरूण जगताप (उपनेते), अध्यक्ष शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय अध्यक्ष: ऑल इंडिया कंन्युजूमर फोरम,व एकनाथ मोरेश्वर शेलार सहसचिव महाराष्ट्र राज्य, शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या हातून त्यांना नुकतेच नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सौ. आरती ओंकार बसवंती, शिवसेना शहर प्रमुख म्हणून (मुन्ना भोसले, तालुकाप्रमुख शिवाजी बाबर यांचेसह इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षाचं जाळं संपुर्ण सोलापूर जिल्ह्यात पसरविण्यासाठी प्रयत्न करीन तसेच जिल्ह्यातील ग्राहकांच्या संरक्षणासाठी व हितासाठी सदैव प्रयत्न करीन. अशी प्रतिक्रिया यावेळी नुतन शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष सोलापूर जिल्हा प्रमुख ओंकार बसवंती यांनी दिली आहे.
0 Comments