Loksabha Election : भाजपाकडून महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर! माढ्यात पुन्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर, बीडमधून पंकजा मुंडे ना संधी

Loksabha Election 2024
Pandharpur Live News Online: भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या दुसऱ्या यादीमध्ये माढा लोकसभा (Madha Loksabha ) मतदारसंघातून पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माढ्याच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला असला तरीही मोहिते पाटील (Mohite Patil) यांच्या भूमिकेकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. राज्यातील २० जागेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना नागपूरमधून,  बीडमंधून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना संधी दिली असून माढा लोकसभेच्या जागेसाठी पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाची घोषणा केली आहे.

महाराष्ट्रातून 5 विद्यमान भाजप खासदारांचे तिकीट कापलं गेलंय. जळगाव, बीड आणि मुंबईतील दोन मतदारसंघातील खासदारांना घरी बसवण्यात आलंय. बीडमध्ये प्रीतम मुंडे यांच्याऐवजी त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झालीय. उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि उत्तर पूर्व मुंबईतून विद्यमान खासदार मनोज कोटक यांच्याऐवजी मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांना तिकीट देण्यात आलंय. जळगावमध्ये उन्मेश पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ या नव्या उमेदवार असतील. तर अकोल्यात विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्याऐवजी त्यांचेच चिरंजीव अनुप धोत्रे यांना भाजपनं उमेदवारी दिलीय.

2019 साली संजयमामा शिंदे यांनी मोहिते पाटील परिवार भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून माढा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी आणली होती पण त्यावेळी मोहिते पाटील परिवारांनी भाजपला दिलेल्या शब्दांनुसार माळशिरस तालुक्यातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना तब्बल एक लाख 13 हजार इतके मताधिक्य दिले होते. त्यामतांच्या जोरावरच संजयमामा शिंदे यांचा पराभव झाला होता.

खालील प्रमाणे महाराष्ट्रातील २० जागा व उमेदवारांची यादी

नंदुरबार - हिना गावित
धुळे - सुभाष भामरे
जळगाव - स्मिता वाघ
रावेर - रक्षा खडसे
अकोला - अनुप धोत्रे
वर्धा - रामदास तडस
नागपूर - नितीन गडकरी
चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार
नांदेड - प्रतापराव चिखलीकर
जालना - रावसाहेब दानवे
दिंडोरी - भारती पवार
भिवंडी - कपिल पाटील
मुंबई उत्तर - पियुष गोयल
मुंबई उत्तर पूर्व - मिहिर कोटेचा
पुणे - मुरलीधर मोहळ
अहमदनगर - सुजय विखे पाटील
लातूर - सुधाकर सुंगारे
बीड - पंकजा मुंडे
माढा - रणजित नाईक निंबाळकर

सांगली - संजय काका पाटील


Post a Comment

2 Comments

  1. उमेदवारी काय जाहीर केली चॅनल न्यूज चॅनल ला निवडून आल्या सारख वाटते... मैदान लांब नाही

    ReplyDelete
  2. उमेदवारी काय निवडली जिंकूनच आल्या सारखे वाटल #न्यूज chanal

    ReplyDelete