स्वागताला वरूणराजाचीही हजेरीशहरात गणेश भक्तांची गर्दी
ढोल-ताशांचा गजर अन् 'गणपती बप्पा मोरया'च्या जयघोषात शुक्रवारी (दि.२९) गणेश भक्तांनी लाडक्या गणरायाचे जल्लोषात स्वागत केले. गणरायाच्या स्वागताला दुपारपासूनच वरूणराजानेही जोरदार हजेरी लावल्याने विक्रेत्यांची तारांबळ उडाली, मात्र गणेश भक्तांचा आनंद कायम होता.
शहर व तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून विविध गणेश मंडळांची गणेशोत्सवाची तयारी सुरू आहे. शहरातील गल्लीबोळात, तर ग्रामीण भागात प्रत्येक वाडीवस्तीवर गणेशाची प्रतिष्ठापना करण्यासाठी पत्राशेड, मंडपांची उभारणी करण्यात आली आहे. शुक्रवारी गणेश चतुर्थी असल्याने सकाळपासूनच गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांची लगबग सुरू होती. ग्रामीण भागातील गणेश मंडळांनी सजविलेल्या ट्रॅक्टर, जीपमधून गणरायाला नेण्यासाठी पंढरपुरात गर्दी केली होती. वाहनांवरच ढोल-ताशांचा गजर सुरू होता. अनेक लहान मंडळांनी मोटारसायकलींवरच गणरायाला नेणे पसंद केले. गेल्या आठवडाभरापासून दररोज पाऊस पडत असल्याने साचलेले पाणी, चिखल दिसून येत होता.
शहरातील मंडळांनी मात्र रात्री ७ वाजल्यापासून मिरवणुका काढून आपापल्या मंडळांच्या शेडमध्ये आणले. मोठय़ा मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी टी-शर्ट, बनियन छापून आणि ढोल-ताशांसह शिस्तबध्द मिरवणुकीने गणरायाचे स्वागत केले. 'गणपती बप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया.'च्या जयघोषाने शहर परिसर दुमदुमून गेला होता.
यंदाच्या पावसाळय़ात पावसाने दडी मारल्याने तालुक्यावर दुष्काळाची गडद छाया उमटू लागली होती. मात्र, गणेशोत्सवाच्या तोंडावर गेल्या आठवडाभरात बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत झाल्याचेच चित्र निर्माण झाले आहे. पावसाने शेतीची कामे खोळंबली असल्याने शेतकरी व गणेशभक्तांना विश्रांती मिळाली असून आज गणरायाच्या स्वागतासाला सर्वत्र अबालवृध्दांची गर्दी झाल्याचे दिसून आले.
शहरात १४0 नियोजित गणेश मंडळे आहेत. यापैकी ४१ मंडळांनी दुपारपर्यंत शहर पोलिसांकडून परवानगी घेतली आहे. सायंकाळपर्यंत ८५ मंडळांनी गणेशाची प्रतिष्ठापना केली होती. तालुक्यात २१६ नियोजित गणेश मंडळे आहेत. त्यापैकी ६0 मंडळांनी पोलिसांची परवानगी घेतली आहे. रात्री उशिरापर्यंत परवानगी घेण्यासाठी शहर व तालुका पोलीस ठाण्यात गणेश भक्तांची गर्दी होती. तालुक्यात जास्तीत जास्त गावात 'एक गाव एक गणपती' योजना राबविण्याचा पोलिसांचा प्रय▪होता. त्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश जाधव आणि तालुका पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचार्यांनी गावोगावी समन्वय बैठका घेतल्या. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचेच दिसून आले आहे. प्रत्येक गावात, वाडीवस्तीवर अनेक मंडळांनी गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे.
१३ ठिकाणी 'एक गाव एक गणपती'
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश जाधव व तालुका पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांनी आठवडाभरापासून ग्रामीण भागातील मंडळांना 'एक गांव - एक गणपती' योजना यावर्षीही राबविण्याचे आवाहन केले. त्यासाठी आजअखेर ६0 गावांमध्ये पदाधिकार्यांच्या बैठका घेतल्या असून १३ गावांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे पो.नि. जाधव यांनी सांगितले. गणेशोत्सव काळात प्रत्येक भागात पोलीस गस्त राहणार असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने शुक्रवारी गणेशोत्सवानिमित्त 'श्री'ची स्थापना पूजा समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली या उभयतांचे हस्ते करण्यात आली. यावेळी व्यवस्थापक एस.एस. विभुते व मंदिर कर्मचारी.

0 Comments