नित्योपचार सुरू झाले. मंदिरातील दिवसकरी म्हणून बसण्यासंबंधीची बोली पध्दती बंद झाल्याने मंदिर समितीच्या उत्पन्नात चौपट वाढ झाली.मंदिरात श्री विठ्ठल-रूक्मिणी पुजेसाठी रितसर जाहिरात प्रसिध्द करून पुजारी नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मंदिर समितीकडे १९९ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातून ८ विविध जातीचे पुरूष व २ महिलांची नेमणूक करण्यात आली. १ ऑगस्टपासून प्रत्यक्षात सदर पुजार्यांकडून पुजेला सुरूवात झाली. एकाद्या मंदिरात महिलांची पुजारी म्हणून नेमणूक करण्याची राज्यातील ही पहिलीच घटना होती. या निर्णयाचे देशभरातून कौतुक करण्यात आले. दि. १ सप्टेंबर रोजी या नेमणूकीला महिना होत असून, अध्यक्ष डांगे यांच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. मंदिर समिती सर्वे नं.५९ मध्ये भव्य असे भक्त निवास बांधण्याचा निर्णय असून, त्याबाबतची निविदाही प्रसिध्द करण्यात आली आहे. अशा पध्दतीने मंदिर समितीकडून भाविकांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले जात आहेत. डांगे यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीला दोन वर्षे पूर्णमाजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समिती अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेऊन सोमवार दि. १ सप्टेंबर रोजी २ वर्षे पूर्ण होत आहेत. या दोन वर्षाच्या काळात मंदिर समितीच्या कामकाजाला गती आली असून, अनेक विधायक निर्णय घेतल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तत्कालीन पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात ऑनलाईन दर्शन सुरू करण्याची संकल्पना मांडली. त्यासाठी पाठपुरावा सुरू केला. डांगे यांनी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. यामुळे राज्य पराज्यातील भाविकांना घरबसल्या श्री विठ्ठल दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग करता येऊ लागले. यंदा आषाढी यात्रा कालावधीत सुमारे ७0 हजारहून अधिक भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घेतला. दररोज शेकडो भाविक या सुविधेचा लाभ घेत आहेत. मंदिर परिसरात आलेल्या भाविकांना उन्हाळ्यात पिण्यासाठी शुध्द आणि मुबलक पाणी उपलब्ध होत नव्हते. डांगे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर मंदिर समितीकडून दोन ठिकाणी मोफत शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. भाविकांना आपले मोबाईल तसेच इतर सामान ठेवण्यासाठी मंदिर परिसरात अधिक पैसे मोजावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप याठिकाणी माफक दरात समितीकडून लॉकरची सोय करण्यात आली. मंदिरराच्या विविध योजना तसेच फोन नंबर याविषयीची माहिती भाविकांना व्हावी यासाठी ठिकठिकाणी डिजीटल बोर्ड लावण्यात आले. डांगे यांच्या कार्यकाळातच सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय झाला. त्यामध्ये श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरातील बडवे-उत्पात यांचे अधिकार काढून घेण्यात आले. १५ जानेवारी २0१४ रोजी हा निर्णय झाल्यानंतर १८ जानेवारी रोजी प्रत्यक्षात मंदिर समिती कर्मचार्यांकडून श्री विठ्ठल व रूक्मिणीमातेकडील |

0 Comments