पंढरपूरमध्ये शब्द स्पीच (लँग्वेज) थेरेपी सेंटरचे उद्घाटन

 

थेरेपी मुळे कर्णबधीर व सदोष वाचा असणार्‍यांना मुख्य प्रवाहात आणण्यास मदत : डॉ. दुबे

IMG_0172.JPG प्रदर्शित करत आहे   ‘शब्द स्पीच थेरेपी सेंटर’ चे उदघाटन     करताना रुबी क्लिनिक , पुणे चे सिनिअर  ऑडीओलोंजीस्ट डॉ.  आशुतोष दुबे , सौ .  दुबे ,  रुक्मिणी बागडे , बाळासाहेब बडवे  ,  सेंटर च्या संचालिका सौ . अंजली बडवे .

 

पंढरपूर ,प्रतिनिधी :

’‘कर्णबधीर व सदोष वाचा असणार्‍यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्पीच थेरेपीची नितांत आवश्यकता आहे. सोलापूर जिल्ह्यात ही सुविधा उपलब्ध नसल्याने येथील अनेक बालके मतिमंद शाळांमध्ये देखील जात असल्याचे निदर्शनास आले आहे. पंढरपूरात सुरू होत असलेल्या ‘शब्द स्पीच थेरेपी सेंटर’मुळे अशा सर्व बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होणार आहे.’’ असे प्रतिपादन पुण्याचे के.ई.एम. व रूबी हॉल क्लिनीकचे सिनीअर अ‍ॅाडीओलॉजिस्ट डॉ. आशुतोष दुबे यांनी केले.

IMG_0192.JPG प्रदर्शित करत आहे
    येथील शब्द स्पीच (लँग्वेज) थेरेपी सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.रूक्मिणी बागडे या होत्या. व्यासपीठावर डॉ.श्रीकांत देवकते,संचालिका सौ.अंजली अनिरुद्ध बडवे ,श्री.बाळासाहेब बडवे आदि मान्यवर उपस्थित होते.
    ’जिल्ह्यातील पहिल्या स्पीच थेरेपी सेंटरच्या शुभारंभाचा साक्षीदार होण्याचे सदभाग्य आपल्याला लाभत’ असल्याच्या भावना यावेळी डॉ.सौ.बागडे यांनी व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, ’गर्भावस्थेमध्येच मुलांना ऐकण्याची सवय लागते.त्यांची कर्णेंद्रीये आठव्या महिन्यापासूनच विकसीत होत असतात. त्यामुळे ही प्रगती दोन वर्षापर्यंत हळूहळू होते आणि मुलगा बोलू लागतो. कर्णबधीर मुलांची समस्या साधारणपणे दुसर्‍या वर्षी लक्षात येते. तोपर्यंत त्याच्यावर ऐकण्याचे कुठलेच संस्कार झालेले नसतात. त्यामुळे तो बोलूही शकत नाही. म्हणून त्याला नॉर्मल शाळेमध्ये देखील प्रवेश मिळत नाही. परंतु योग्य तपासण्यानंतर ऐकू येण्यासाठी योग्य ते श्रवणयंत्र आणि बोलण्यासाठी स्पीच थेरेपी दिली तर त्याचे जीवन पूर्णपणे बदलून जाते.’
    यावेळी बोलतांना डॉ.बागडे यांनी सांगितले की, ’अनेक मुलांना ऐकू येत नसल्याने ते बोलत नाहीत म्हणून त्यांना मतिमंद ठरवून थेट मतीमंद विद्यालयात त्यांची रवानगी केली जाते किंवा मूकबधीर शाळेत पाठविले जाते. केवळ ऐकण्याच्या दोषावर उपाय न केल्याने त्याचे संपूर्ण जीवन कठीण मार्गाला जाते. स्पीच थेरेपीमुळे अशा वाटा चुकलेल्यांना पुन्हा जीवन प्राप्त करून देण्याचे मोठे काम आता पंढरपूरात होणार आहे.’
    यावेळी बोलतांना श्री. बाळासाहेब बडवे यांनी सांगितले की, ’कमी ऐकू येणार्‍या बालकांना मशीन लावल्यावर लगेच बोलण्यासाठी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. ही सोय सोलापूर जिल्ह्यात कुठेच उपलब्ध नाही म्हणून थेट पुण्याला जावे लागते. प्रत्येकाला हे परवडणारे नाही म्हणून सामाजिक बांधीलकीतून हे सेंटर चालावे.’
    यावेळी सौ.आरती पाटील, सचिन साखरे, सौ.अर्चना माने-देशमुख या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
    यावेळी रेडीओ सिटी टॉप सिंगरसाठी निवड झालेली सोलापूर जिल्ह्याची सुपूत्री मनाली केकडे हिचा ‘शब्द सेंटर’च्या वतीने शाल,पुष्पगुच्छ आणि नटराजाची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेंटरच्या संचालिका सौ.अंजली अ.बडवे यांनी केले तर सूत्रसंचालन दिपक द. निकते यांनी केले. 

Post a Comment

0 Comments