पंढरपूर (पंढरपूर लाईव्ह):-
कार्तिकी यात्रेदरम्यान, देणगी पावतीच्या माध्यमातून श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीला 54 लाख 7 हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले असल्याची माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली.
दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत मंदिर समितीच्या उत्पन्नात वाढ झाली असून, एकादशीच्या दिवशी 11 लाख 66 हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले. मंदिरात विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या दानपेटीतील रक्कम अद्याप मोजणे बाकी आहे. पुणे येथील विठ्ठल सेवा मंडळाच्या सुमारे 200 हून अधिक स्वयंसेवकांकडून यात्रा कालवधीत देणगी जमा करण्याचे काम मोफत केले जाते. मंदिराबाहेर तसेच मंदिरात ठिकठिकाणी देणगी स्विकारली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून विठ्ठल मंडळाकडून देणगी जमा करण्याचे काम करण्यात येत आहे. 20 रूपयांपासून पुढच्या देणगी पावत्या यामध्ये फाडल्या जातात. जमा झालेल्या देणगीचा हिशोब रोजच्या रोज मंदिर समितीला दिला जातो. विठ्ठल सेवा मंडळातील सर्व स्वयंसेवकांची राहण्याची तसेच भोजनाची व्यवस्था ही मंदिर समितीकडून संत तुकाराम भवन येथे करण्यात येते. भाविकांची मोठी गर्दी असते.
भाविकांचे यात्रा काळात ऑनलाईन दर्शन
कार्तिकी यात्रा कालावधीत 25 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर पर्यंत राज्य-परराज्यातील 37 हजार 292 भाविकांनी ऑनलाईन दर्शन बुकींग केले आहे. त्यामध्ये 5 नोव्हेंबर अखेर 33 हजार 819 भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले. एकादशीच्या दिवशी रात्रीच्या कालावधीत दर्शन बंद असल्याने 2 हजार 500 तर इतर दिवशी दररोज 5 हजार 500 भाविकांना ऑनलाईन दर्शनाचा लाभ घेता आला. त्यादिवशी 11 लाख 7 हजार रूपयांची देणगी जमा झाल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले.
जमा झालेली 54 लाख रूपयांची देणगी ही 24 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यानची आहे. देणगी पावत्यांव्यतिरिक्त अन्नक्षेत्र मंडळ तसेच इतर योजनांसाठीही भाविक देणगी देत असतात. यामाध्यमातूनही मंदिर समिती उत्पन्नात वाढ होत आहे. एकादशीच्या दिवशी33 हजार 819 भाविकांनी घेतले.

0 Comments