ठाणे- (पंढरपूर लाईव्ह):- मुलीने शाळा सोडल्याचा
दाखला मागणाऱ्या पालकाकडून १३ हजार रुपये शैक्षणिक शुल्क घेणाऱ्या
ठाण्यातील बिला बाँग इंटरनॅशनल शाळेच्या प्रिन्सिपल आणि ट्रस्टी यांना ठाणे
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ताळ्यावर आणले आहे. हे शैक्षणिक शुल्क
परत न करून शाळेने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचा ठपका ग्राहक
मंचाने ठेवला आहे. शाळेने आकारलेले १३ हजारांचे शैक्षणिक शुल्क आणि नुकसान
भरपार्ई व मानसिक त्रासापोटी १५ हजार रुपये पालकाला ३० दिवसांत द्यावेत,
असा आदेश मंचाने नुकताच दिला आहे.
ठाण्यात समर कॅसल येथे राहणाऱ्या पूर्वा संजय आपटे यांची मुलगी संजना बिला बाँग शाळेत इयत्ता पाचवीत शिकत होती. मात्र इयत्ता सहावीत संजनाला दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला हवा होता. त्यासाठी पूर्वी आपटे यांनी संजनाचा शाळा सोडल्याचा दाखला शाळेकडे मागितला. मात्र शैक्षणिक शुल्क म्हणून १३ हजार रुपये भरल्यावरच दाखला मिळेल, असे शाळेतर्फे त्यांना सांगण्यात आले. नार्ईलाजाने, आपटे यांनी २० एप्रिल २०१० रोजी ही रक्कम भरली. त्यानंतर २४ एप्रिल रोजी त्यांना संजनाने शाळा सोडल्याचा दाखला देण्यात आला. इयत्ता सहावीचा अभ्यासक्रम न शिकवता शैक्षणिक शुल्क स्वीकारणाऱ्या शाळेकडून ही रक्कम परत मिळावी, अशी विनंती पूर्वा आपटे यांनी नंतर ग्राहक मंचाकडे केली होती. त्यानुसार, मंचाने शाळेला आपले म्हणणे लेखी दाखल करण्याची नोटीस बजावली. परंतु शाळेने लेखी म्हणणे मांडलेच नाही.
अखेर याप्रकरणी निकाल देताना, शाळेचे प्रिन्सिपल व ट्रस्टी यांनी वैयक्तिक व संयुक्तपणे शैक्षणिक शुल्क स्वीकारून त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला देऊन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे मत मंचाचे अध्यक्ष उमेश जावळीकर यांनी मांडले. त्यामुळे ३० दिवसांत आपटे यांना १३ हजार रुपये शैक्षणिक शुल्क आणि मानसिक त्रास, तक्रार खर्च आणि नुकसान भरपार्ईपोटी १५ हजार रुपये द्यावेत, असा आदेश मंचाने दिला.
पंढरपूरचे पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी महाराष्ट्राच्या कानाकोर्यातून विविध भागातील ताज्या बातम्या पाठविणेसाठी प्रतिनिधी नेमणे आहेत... या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्या तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...
-संपादक
भगवान गणपतराव वानखेडे
सा.झंझावात,
पंढरपूर लाईव्ह
मोबा. 8055434499
8308838111
8552823399
कृपया इच्छूकांनी आपले अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या संपुर्ण बायोडाटासह
livepandharpur@gmail.com
jhanjavat@gmail.com
या मेल आय डी वर ई-मेल करावेत.
ताज्या घडामोडी साठी बघत रहा....
www.pandharpurlive.com
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

0 Comments