संत कैकाडी महाराज मंदीरामध्ये वस्त्रदान सोहळा संपन्न

2222222.jpg प्रदर्शित करत आहे  (पंढरपूर लाईव्ह):-

महान तपस्वी श्री संत कैकाडी बाबांच्या मंदीरामध्ये सालाबादाप्रमाणे संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून कार्तिकी एकादशी निमित्त भव्य प्रमाणात वस्त्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी संस्थेचेअध्यक्ष ह.भ.प रामदास महाराज व प्रमुख विश्वस्त काशीनाथ गायकवाड, ह.भ.प.दयाधन महाराज यांची प्रमुख उपस्थित होती.

11111111.jpg प्रदर्शित करत आहे             श्री. संत कैकाडी बाबांनी आपल्या ह्यातीत लावलेली वस्त्रदान व अन्नदानाची ज्योत त्यांचे वारसदार ह.भ.प रामदास महाराज प्रसिद्ध  किर्तनाकार म्हणुन लौकीक आहे. त्यांनी ही ज्योत आजही अखंडपणे तेवत ठेवली आहे. जवळ जवळ हजारो गोरगरीब, अंध, अपंग, रोगी, महारोगी, निराधारांना धोतर, शर्ट, साड्या यांचे वाटप केले.
             याप्रसंगी ह.भ.प रामदास महाराज म्हणाले की, जेका रंजले-गांजलेत्यासी म्हणेजो आपुले  देव साधुसज्जना रुपानेआपल्याला रोकडा भेटतो अशा ठिकाणी राजकीय खोटेआश्वासन नसते.  खरे सत्य स्वरुप असते. संत कैकाडी बाबांच्या कृपेने या वस्त्रदानाच्या रुपात  आज 70 ते 80 वर्षा पासूण गोर गरीब जनतेला प्राप्त होत असून, यांच्या सहकार्यातील आम्ही एक आहोत याचा आम्हांला अभिमान वाटतो. याप्रसंगी मधुकर केशव पंडीत, भारत जाधव, किशोर जाधव , मुक्ताजी पाटील, पानगव्हाणे. दिपक जाधव, निलेश जाधव, श्रीकांत माने, महेश माने,  अमोल मानेयांच्यासह वस्त्रदान सोहळ्यास आलेले वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments