सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाने कोट्यावधीचा खर्च पाण्यात

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjsaU-A-Zc0n1_53LXy-PPRZ6QipjB26Pxedj3clFK4WellHw0qQpmwHtW6GsExsitxLV9CxibPi0hWt99_ul9YMtj7eyJ_BPQq8ga_PirMZEw5GSt19npaM1bagNFLWRbH0_H8H9R_Gg/s1600/DSC_6371.JPG

               सांगोला

             (पंढरपूर लाईव्ह साठी शंतनु शेळके) - 

                       सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिकेच्या वादात सांगोला शहरातील हायवे नजीक सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधलेल्या गटारी केरकचरा सांडपाण्याने व पावसाचे पाणी साचल्याने तुडुंब भरलेल्या आहेत.या गटारीमध्ये साचलेला कचरा व पाण्यामुळे पसरलेली दुर्गंधी रोडनजीक असणाऱ्या असंख्य व्याव्सायधार्कांचे आरोग्य धोक्यात आले आहे.याबाबत संबंधित विभागाने टोलवाटोलवी न करता तात्काळ गटारी साफ करून घ्याव्यात अशी मागणी सांगोला शहरवासीय करीत आहेत.

            
                         सांगोला शहरात पंचायत समिती पासून ते मिरज रोड रेल्वेगेटपर्यंत रोडजवळून मोठ्या गटारीचे बांधकाम सा.बा.वि.कडून करण्यात आले आहे.या बांधकामासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले.परंतु सा.बा.वि.च्या भ्रष्ट कारभारामुळे झालेला कोट्यावधीचा खर्च सध्यातरी पाण्यात गेले आहेत.असे म्हंटल्यास त्यामध्ये काही गैर ठरणार नाही.या गटारी साबावी च्या जागेत आहेत पण या नगरपालिकेच्या हद्दीत आहेत त्यामुळे साबावी चे म्हणणे आहे कि याची सफाई नगरपालिकेने करावी आणि नगरपालिकेचे म्हणणे आहे कि या गटारी साबावी खात्याच्या जागेत आहे.व साबावी ने बांधल्या आहेत त्या नगरपरिषदकडे वर्ग केलेले नाहीत त्यामुळे नगरपालिकेचा काहीही संबंध नाही या साबावी खात्याने बांधलेल्या गटारी रोडनजीक असल्याने ह्या गटारींची सफाई साबावी करेल असे नगरपालिकेकडून सांगण्यात येत आहे.या साबावी व नगरपालिकेच्या रोडलगत असणाऱ्या गटारी अनेक दिवसापासून दुर्गंधी व आरोग्यास अपायकारक ठरत आहे मात्र याकडे दोन्हीही विभागाचे लक्ष नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
            
 सध्या हवामानात बदल होत आहे.हवेमध्ये गर्व पसरल्याने शासकीय रुग्णालयात रुग्णांची  संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे तर दुसरीकडे चिकन गुनिया या रोगाची लागण खेड्यातील वाड्या वस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दिसत आहे.यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण सर्वत्र पसरले आहे.अशातच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिकेच्या वादात सांगोला शहरातील हायवे नजीक सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधलेल्या गटारी केरकचरा सांडपाण्याने व पावसाचे पाणी साचल्याने तुडुंब भरलेल्या असल्याने चार शोधत भटकणाऱ्या जनावरांचा या गटारीमध्ये पडून अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे अनेक नागरिकांचे या गटारीत पडून हात पाय मोडले आहेत तसेच यामधून डासांचा फैलावही मोठ्या प्रमाणात होत आहे.या सर्व गटारी दोन्ही विभागाने गांभीर्याने विचार करून ताबडतोब दुरुस्त कराव्यात अशी मागणी सांगोला शहरवासियामधून होत आहे. 
(फोटो -प्रतिकात्मक)
  • अधिकारीच भ्रष्ट असल्याने...........

  • सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी भ्रष्ट आहेत ते कोणाचेही एकूण घेत नाहीत. 

  • ते काम करण्याऐवजी बोलबच्चन करत असल्याने कि काय त्यांनी सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख आणि सोलापूर जिल्ह्याचे आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी हा प्रश्‍न सोडविण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना आदेश देवूनही साबावी चे अधिकारी भ्रष्ट कारभार करण्यात आपली धन्यता मानत आहेत  असे आढळते. 

  • संबंधित अधिकार्‍यांनी जनतेच्या संयमाचा अंत बघू नये... जनतेच्या कल्याणासाठीच आपण या पदावर आहोत याची जाणीव ठेवून योग्य ते पाऊल उचलावे अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.

Post a Comment

0 Comments