पंढरपूर (पंढरपूर लाईव्ह):-
महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा विभागाचे सचिवपदी पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी या गावचे सुपूत्र व वाल्मी (औरंगाबाद) येथील कार्यकारी संचालक श्री.हिरालाल तात्या मेंढेगिरी यांची बुधवारी शासनाने नियुक्ती केली.
श्री.मेंढेगिरी हे जलसंपदा विभागातील धाडसी व प्रामाणिक अधिकारी म्हणून परिचित आहेत. गोसीखुर्द प्रकल्पातील घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी आघाडी सरकारने त्यांचे अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या प्रकल्पातील अनेक गैरव्यवहारात त्यांच्या अहवालातून प्रकाश टाकण्यात आला होता.
श्री.मेंढेगिरी हे मुळचे मु.पो.जैनवाडी, ता.पंढरपूर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील आहेत. ते पंढरपूर तालुक्यात शासनातील दक्ष अधिकारी म्हणून सुपरिचित आहेत.
वरील नियुक्तीबाबत पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन श्री.प्रशांतराव परिचारक यांनी अभिनंदन करुन त्यांचे भावी कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.श्री.मेंढेगिरी हे मुळचे मु.पो.जैनवाडी, ता.पंढरपूर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील आहेत. ते पंढरपूर तालुक्यात शासनातील दक्ष अधिकारी म्हणून सुपरिचित आहेत.
जैनवाडी ता.पंढरपूर येथील विकास सेवा सोसायटीचे चेअरमन किरण दानोळे, माजी सरपंच अशोक मिरजे, ग्रामपंचायत सदस्य सदलगे, गजेंद्र देसाई, अनिल नांदरे, सुनिल वठारे, अॅड.पंकज हदगिणे व समस्त ग्रामस्थांमधून पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

0 Comments