पंढरपूर लाईव्ह:-
येथील ग्रामीण साहित्यिक, प्राचार्य शिवाजीराव बागल यांच्या 'हंबरडा' या ग्रामीण कथा संग्रहास अहमदनगर येथील शब्दगंध साहित्य परिषदेच्यावतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय 'शब्दगंध साहित्य पुरस्कार २0१४' जाहीर झाला आहे.
शब्दगंध साहित्यिक परिषदेचे ११ वे राज्यस्तरीय साहित्य संमेलन येत्या जानेवारीमध्ये होत आहे. यावेळी प्रा.बागल यांना मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यापूर्वी प्रा.बागल यांची 'आडपाया', 'हंबरडा', 'आवतनं', 'गावशिवारातील माणसं' ही पुस्तके प्रकाशित झाली असून 'स्वीकार' ही कादंबरी प्रकाशनाच्या वाटेवर आहे. राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालेबद्दल सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काळे, तसेच रविराज सोनार, कवी राजेंद्र भोसले, राजेश बादले-पाटील, अंकुश गाजरे, गणेश गायकवाड, रावसाहेब साठे, दादासाहेब खरात, प्रदीप पांढरे, प्रताप चव्हाण यांनी प्रा.बागल यांचे अभिनंदन केले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी... विविध उद्योजक, व्यापारी व संस्था आता
आपल्या जाहिराती पंढरपूर लाईव्हसाठी देवू शकतात... तसेच वाढदिवस वगैरे
शुभेच्छा जाहिराती व विविध समारंभाच्या आमंत्रणाच्या जाहिराती सुध्दा आपण
पंढरपूर लाईव्ह वर देवू शकता...
आपल्या जाहिराती पाठविण्यासाठी खालील ई-मेल आय डी वर संपर्क साधावा...
livepandharpur@gmail.com jhanjavat@gmail.com
मोबा. 8055434499, 8308838111, 8552823399
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
पंढरपूरचे
पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी
महाराष्ट्राच्या
कानाकोर्यातून विविध भागातील ताज्या बातम्या पाठविणेसाठी
प्रतिनिधी नेमणे आहेत...
या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्या
तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...
-संपादक :- भगवान गणपतराव वानखेडे
सा.झंझावात, पंढरपूर लाईव्ह
मोबा. 8055434499, 8308838111, 8552823399
कृपया इच्छूकांनी आपले अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या संपुर्ण बायोडाटासह
livepandharpur@gmail.com jhanjavat@gmail.com
या मेल आय डी वर ई-मेल करावेत.
या मेल आय डी वर ई-मेल करावेत.
ताज्या घडामोडी साठी बघत रहा....
www.pandharpurlive.com

0 Comments