खिलार जनावरे पाळण्याकडे शेतकर्‍यांनी लक्ष द्यावे : परिचारक खिलार जनावरे व घोड्यांच्या सौंदर्य आणि नृत्य स्पर्धेचे बक्षिस वितरण

  (पंढरपूर लाईव्ह):-   

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अनेक शेतकरी यंत्राच्या सहाय्याने शेती करीत आहेत. यामुळे खिलार जनावरे पाळण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. कार्तिकी यात्रेमध्ये पंढरीत भरणारा खिलार जनावरांचा एकमेव मोठा बाजार असून, खिलार जनावरे पाळण्याकडे शेतकर्‍यांनी लक्ष द्यावे, असे प्रतिपादन माजी आमदार सुधाकर परिचारक यांनी केले.


                  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कार्तिकी यात्रा 2014 च्या निमित्ताने भरविण्यात आलेल्या खिलार जनावरे प्रोत्साहनपर प्रदर्शन व घोडे सौंदर्य आणि नृत्य स्पर्धेमध्ये निवड झालेल्यांचा बक्षिस वितरण समारंभ मंगळवार दि. 4 रोजी सायंकाळी पार पडला. यावेळी परिचारक बोलत होते. पंढरीत घोडेबाजाराला दीडशे वर्षांची परंपरा आहे. पंढरपूरच्या बाजारातील घोडा देवांच्या पालख्यांसाठी खरेदी करावा, अशी अनेक घोडेशौकीनांचीअसल्याचे परिचारक यांनी सांगितले.
यावेळी स्पर्धेत अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या खिलार जनावरे व घोडे मालकांना बक्षिसांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. घोडे सौंदर्य स्पर्धेत आदिकराव भोसले यांच्या घोड्याने प्रथम, ईश्‍वर भोसले द्वितीय तर अमर थिटे यांच्या घोड्याने तृतीय क्रमांक पटकाविला. नृत्य स्पर्धेत लक्ष्मण कांबळे यांच्या घोड्याने प्रथम, शैलेश माने द्वितीय तर सिध्देश्‍वर लोखंडे व ईश्‍वर भोसले यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच खिलार जनावरांच्या प्रोत्साहनपर स्पर्धेत सहभागी झालेल्या 51 स्पर्धाकांना यावेळी बक्षिस व प्रशस्तीपत्र देण्यात आले.

                 या कार्यक्रमास सभापती दाजी भुसनर-पाटील, उपसभापती गंगाराम विभुते, ’पांडुरंग’चे चेअरमन दिनकर मोरे, चंद्रकात देशमुख, अँड़ संतोष देशमुख, कल्याणराव पाटील, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, सुरेश आगावणे, औदूंबर मेटकरी, दिलीप चव्हाण, सचिव कुमार घोडके, सिताराम नागणे, बहीरू माळी, चंद्रकांत थिटे, हिरालाल शेख, अँड़ भोसले यांच्यासह संचालक विष्णू रेडे, दत्तात्रय ताड, दिगंबर वाघमारे, सोमनाथ डोंबे, संतोष घोडके, दाऊद बागवान, विजय जाधव, शहाजी साळुंखे, गणेश नाईकनवरे, सत्यवान करांडे, बाळकृष्ण घोडके आदी उपस्थित होते.इच्छा असते. त्यामुळे पंढरीतील घोडेबाजार हा अखंडीतपणे सुरू रहावा यासाठी सर्वतोपरी प्रर्तंकेला जाणार आहे. व्यापारी, शेतकरी तसेच घोडेशौकीन यांनी या बाजाराची परंपरा सुरू ठेवण्यासाठी सहकार्य केले

Post a Comment

0 Comments