सांगोल्यात शहीद कामटे संघटनेच्या वतीने ‘किल्ला स्पर्धा’ बक्षीस वितरण

सांगोला (पंढरपूर लाईव्ह प्रतिनिधी):- सांगोला (जि.सोलापूर) येथील शहीद कामटे सामाजिक संस्थेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी किल्ला बांधणी, किल्ला सजावट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षीच्या स्पर्धांचे बक्षीस वितरण शहरातील प्रतिष्ठीत नागरिक दिपक दिक्षीत व संघटनेचे आशिष जाधव  यांच्या हस्ते पार पडले.

             शहीद कामटे संघटने च्या वतीने वर्षभरात जे विविध उपक्रम राबविले जात असतात ते खरोखरच कौतूकास्पद असतात. अशा उपक्रमांमुळे  छत्रपती शिवाजीमहाराजांच्या ज्वलंत इतिहासाचे, स्वधर्माचे संस्कार  बालवयातच मुलांवर होण्यास मदत होते असे प्रतिपादन यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिपक दिक्षीत यांनी केले.
                प्रारंभी शहीद अशोक कामटे यांच्या प्रतिमेचे पुजन आशिष जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष अच्यूत  फुले, चारुदत्त खडतरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
   2014 किल्ला स्पर्धामध्ये प्रतिक गाडे (प्रथम क्र.), चैतन्य बिडकर (द्वितीय क्र.) व चैतन्य देशपांडे (तृतीय क्र.)  या विजेत्या स्पर्धकांचा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देवून विशेष गौरव करण्यात आला. तसेच उत्तेजनार्थ किल्ले सजावटीमध्ये चैतन्य दिक्षीत, पवनराजे जाधव, स्वरुप देशपांडे, शौर्य पोळ-सरमजामदार, विभावरी देशपांडे, यथार्थ पोळ, आदित्य मांगूळकर, यांना इतर पारितोषिके देण्यात आली.
     
         कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संपर्क प्रमुख निलकंठ शिंदे सर यांनी केले तर आभार मयुर देशपांडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments