पंढरीत स्वच्छता अभियानाची सुरुवात

         
      पंढरपूर (पंढरपूर लाईव्ह):- श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत वाढणारी अस्वच्छता व रोगराई विचारात घेवून पंढरपूरातील काही युवक वर्गाने ‘पंढरी स्वच्छता अभियान’ सुरु केले आहे. यास वारकरी पाईक संघटना व सर्व महाराज मंडळी  यांचाही पाठींबा आहे.

              या अभियानाचे पहिले पाऊल म्हणून तसेच प्रथम पंढरपूरच्या नागरिकांना व वारकर्‍यांना स्वच्छतेची जाणीव व्हावी यासाठी संपुर्ण मंदिर परीसर व चंद्रभागा वाळवंटात स्वच्छतेचे आवाहन करणारे सुचना बोर्ड लावण्यात आलेले आहेत.
              या उपक्रमाचे उद्घाटन श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर पालखी चे चोपदार बाळासाहेब रंदवे व बाबासाहेब बडवे महाजन यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना बाबासाहेब बडवे महाजन म्हणाले की, ‘‘अभियानातील युवकांनो आपणास आमच्या पंढरपूरकरांच्या शुभेच्छा आहेतच. स्वच्छतेच्या कामासाठी पुढे या! व पंढरीचे सौंदर्य वाढविण्यासाठी हातभार लावा.’’ असे आवाहन केले. हा उपक्रम ह.भ.प. श्री. राणा महाराज वासकर, संतोष देशपांडे व गणेश महाराज कराडकर यांच्या संकल्पनेतून साकारला आहे. तरी स्वच्छतेचे हे शिवधनुष्य या युवकांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी यस्वीरित्या पेललेली आहे.. पुढेही ते पेलतील याची आम्हाला खात्री आहे असेही ते म्हणाले.
यावेळी देवीदास ढवळीकर महाराज, देवीदास कांबळे, योगेश पिंपळनेरकर, आशिष खिस्ते, सचिन कोळी, गणेश बडवे महाजन, अमीत घोडके, कौस्तुभ चुंबळकर, प्रसाद गवारे, अतुल अनपट व पश्‍चिमद्वार व्यापारी संघटनेचे सदस्य उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments