चतुरस्त्र अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांना आदरांजली...

          
    चतुरस्त्र मराठी माणसाला माझे विनम्र अभिवादन !

अमजद खान, अमरीश पुरी यांच्यानंतर चे सर्वात खतरनाक वाटणारे हिंदी -मराठी चित्रपटातील खलनायक सदाशिव अमरापूरकर यांचे अकाली निधन झाले.  ६५ वर्षे हे काही मारण्याचे वय नाही तर आणखी खूप काही करण्याचे वय असते .

              हिरो कोण आहे यापेक्षा विलेन कोण आहे पाहून पिक्चर पाहण्याच्या एका जमान्यात सदाशिव अमरापूरकर यांच्यासाठी अनेक वेळा थिएटर मध्ये जाऊन त्यांच्या खलनायकिला दाद दिली.
अर्ध सत्य, हुकुमत, नका बंदी, दूध का कर्ज, फरिश्ते, सडक, आखरी रास्ता, इझ्झत, खिचडी,सावरखेड एक गाव अश्या चित्रपटातील त्यांचा खलनायक वाईट प्रवृत्ती विषयी मनात चीड निर्माण करणारा होता. त्याचवेळी आंखे, राजा बाबू, हम किसी से कम नहि, इश्क, हम ही कमाल के अशा त्यांच्या विनोदी भूमिका रसिकांनी डोक्यावर घेतल्या. झेड पी. या त्यांच्या मराठी सिनेमाने तर त्याकाळी गर्दीचा विक्रम केला होता. एकाच थिएटरला ६-८ शो लावले गेले होते.
                नाना पाटेकर, मोहन जोशी, माधुरी दीक्षित बरोबर हिंदी पडदा गाजवणारा एक मराठी माणूस अकाली गेला हे असह्य आहे . केवळ एक कलाकार म्हणून ते ग्रेट होतेच पण निळू फुले, श्रीराम लागू यांच्या बरोबरच रुपेरी पडद्यावरचे पुरोगामी विचाराचे व्यक्तिमत्व म्हणूनही त्यांचे मोठेपण वादातीत आहे.
अशा या चतुरस्त्र मराठी माणसाला माझे विनम्र अभिवादन !

                          नवनाथ पोरे (पत्रकार)
                             पंढरपूर 

Post a Comment

0 Comments