मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य अल्प परिचय देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या जनतेचे प्रतिनिधित्त्व करत असतानाच पक्षांतर्गत विविध स्तरांवर नेतृत्त्व केले. नागपूर महानगरपालिकेतून ते सलग दोनदा (१९९२ व १९९७) निवडून आले. नागपूरचे महापौर पद त्यांनी भूषविलेले असून भारतातील आजवरचे दुसरे सर्वात तरुण महापौर अशी त्यांची ख्याती आहे. महापौर पदी पुन्हा निवडून येऊन महाराष्ट्रातून ‘मेअर इन काऊन्सिल’ चा मान मिळविणारे ते पहिलेच. देवेंद्र फडणवीस हे अनुभवी लोकप्रतिनिधी असून राजकीय बुद्धिचातुर्य व कौशल्य यासाठी त्यांना विविध व्यासपिठांनी गौरविलेले आहे. त्यांच्या कार्य-कर्तृत्त्वाची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेलेली असून राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने दिला जाणारा ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तसेच जागतिक संसदीय फोरमच्या सचिवपदी ते कार्यरत आहेत. वैयक्तिक माहिती
वय :४३ ( जन्मदिनाक २२जुलै १९७०)
आई आणि वडिलांचे नाव: श्रीमती सरिता आणि स्व.श्री गंगाधरराव
पत्नी: श्रीमती अमृता, सुपुत्री : कु. दिविजा
शैक्षणिक पात्रता:
श्री.
देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विद्यापीठातून विशेष गुणवत्तेसह कायद्याचे
शिक्षण पूर्ण केले. त्यांनी पदवीनंतर व्यवस्थापनशास्त्राची पदवी मिळविली.
त्यांनी डीएसई बर्लिन या जर्मनीतील संस्थेमध्ये डिप्लोमा इन मेथड्स अँड
टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा मिळविला
लोकप्रतिनिधित्व
१९९९ ते आतापर्यंत – सलग चारवेळा महाराष्ट्र विधानसभा सद्स्य
१९९२ ते २००१ – सलग दोन टर्म नागपूर महापालिकेचे सदस्य, दोनवेळा नागपूरचे महापौर, मेयर इन कौन्सिल पदावर फेरनिवड, असा सन्मान मिळणारे राज्यातील एकमेव.
राजकीय टप्पे
२०१३ – अध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
२०१० – सरचिटणीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
२००१ – राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा
१९९४ – प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा
१९९२ – अध्यक्ष, नागपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चा
१९९० – पदाधिकारी, नागपूर शहर पश्चिम
१९८९ – वॉर्ड अध्यक्ष, भाजयुमो
विधिमंडळातील कार्य
अंदाज समिती, नियम समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नगरविकास व गृहनिर्माणाविषयी स्थायी समिती, राखीव निधीविषयी संयुक्त निवड समिती, स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलची संयुक्त निवड समिती
सामाजिक योगदान
सचिव, ग्लोबल पार्लमेंटेरिअन्स फोरम ऑन हॅबिटाट फॉर एशिया रिजन
नागरी पायाभूत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा आणि राजकीय व्यवस्थापनाच्या मुद्द्यांबाबत रिसोर्स पर्सन
संयुक्त राष्ट्रांची मान्यता मिळालेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई या संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य
नाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष
नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य
आंतरराष्ट्रीय ठसा
१९९९ मध्ये होनोलुलू, अमेरिका येथे इंटरनॅशनल एनव्हायरमेंट समिटमध्ये सहभाग आणि सादरीकरण
२००५ मध्ये अमेरिकेतील वॉशिंग्टन व नॅशविले येथे यू. एस. नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर्स
२००६ मध्ये स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे आयडीआरसी – युनेस्को – डब्ल्यूसीडीआर यांनी आयोजित केलेल्या ‘डिझास्टर मिटिगेशन अँड मॅनेजमेंट इन इंडिया’ या विषयावरील आंतराष्ट्रीय शिखर परिषदेत सादरीकरण
चीनमध्ये बीजिंग येथे डब्ल्यूएमओ – ईएसएसपी यांनी आयोजित केलेल्या ग्लोबल एनव्हायरमेंटल चेंज काँग्रेसमध्ये ‘नॅचरल डिझास्टर्स मिटिगेशन – इश्युज ऑन इकॉलिजिकल अँड सोशल रिस्क’ या विषयी सादरीकरण
२००७ मध्ये डेन्मार्कमध्ये कोपेनहेगेन येथे आशिया व युरोपमधील तरूण राजकीय नेत्यांच्या आसेम परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व
२००८ मध्ये अमेरिकेच्या संघराज्य शासनाच्या ईस्ट – वेस्ट सेंटरतर्फे आयोजित न्यू जनरेशन सेमिनारमध्ये ‘एनर्जी सिक्युरिटी इश्युज’ या विषयावर शोधनिबंध सादर
२००८ मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझिलँड आणि सिंगापूरला गेलेल्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोशिएशनच्या उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळाचे सदस्य
२०१० मध्ये मॉस्को येथे भेट देणार्या इंडो रशिया चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाचे सदस्य
२०११ मध्ये क्रोएशिया येथे ‘ग्लोबल पार्लमेंटरियन फोरम ऑन हॅबिटाट’मध्ये सहभाग,
२०१२ मध्ये मलेशियामध्ये ‘जीपीएच एशिया रिजनल मीट’मध्ये सहभाग
२०१२ मध्ये केनियातील नैरोबी येथे ‘युनायटेड नेशन्स हॅबिटाट’ने निमंत्रित केलेल्या शिष्टमंडळाचे सदस्य
पुरस्कार
कॉमनवेल्थ पार्लमेंटेरियन असोसिएशन २००२-२००३चा सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
राष्ट्रीय आंतर विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्कार
रोटरीचा मोस्ट चॅलेंजिंग यूथ विभागीय पुरस्कार
मुक्तछंद, पुणे या संस्थेतर्फे स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार, नाशिक येथील पूर्णवाद परिवारतर्फे राजयोगी नेता पुरस्कार
Website: http://www.devendrafadnavis.in
https://www.facebook.com/devendra.fadnavis
जन्म : १ जून १९५२
जन्म ठिकाण : कोथळी, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव
शिक्षण : बी.कॉम.
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती मंदाकिनी
व्यवसाय : शेती
पक्ष : भारतीय जनता पक्ष
मतदारसंघ : २० - मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव
इतर माहिती : १९९० ते १९९५ पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य; २००२ पासून महात्मा फुले कृषि विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य; सरचिटणीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश; २००४ पासून अखील भारतीय भाजपाचे कार्यकारिणी सदस्य; १९९०-९५ प्रतोद, भाजपा विधिमंडळ पक्ष; २००३-०४ गटनेता, भाजपा विधिमंडळ पक्ष; महाराष्ट्र विधानसभा; १९९०-९५, १९९५-९९, १९९९-२००४, २००४-२००९ सदस्य, जून १९९५ ते सप्टेंबर १९९५ उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री; सप्टेंबर १९९५ ते जून १९९७ वित्त आणि नियोजन खात्याचे मंत्री; जून १९९७ ते ऑक्टोबर १९९९ पाटबंधारे, लाभक्षेत्र विकास खात्याचे मंत्री; महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते.
श्री.सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार
जन्म : ३० जुलै १९६२
जन्म ठिकाण : चंद्रपूर, तालुका चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर
शिक्षण : एम्. कॉम. एलएल.बी., बी.जे., डी.बी.एम., एम.फिल.
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती सपना
अपत्ये : एकूण १ (एक मुलगी)
व्यवसाय : शेती
पक्ष : भारतीय जनता पक्ष
मतदारसंघ : ७० - बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर
इतर माहिती : अध्यक्ष, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय; अध्यक्ष, राष्ट्रचेतना लोककल्याणकारी संस्था; १९८९ बेरोजगारांच्या हक्कासाठी मोर्चांचे आयोजन; राज्यात स्वतंत्र खनिज विकास मंत्रालय सुरु करणे यामध्ये यश; चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठ निर्मितीसाठीच्या लढ्याचे नेतृत्व; १९८७ अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा; १९९३ उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनाता युवा मोर्चा; १९९६ सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष; २००२ उपाध्यक्ष, अखिल भारतीय युवा मोर्चा; एप्रिल २०१० मध्ये प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष; फेब्रुवारी १९९९ ते ऑक्टोबर, १९९९ राज्याच्या पर्यटन व ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री;
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत फेरनिवड.
जन्म : 20 जुलै, 1963 (51 वर्षे)
जन्म ठिकाण : मुंबई. शिक्षण : बी.ई. (इलेक्ट्रॉनिक्स) ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी वैवाहिक माहिती : पत्नी, सौ. वर्षा अपत्ये : १ मुलगी व्यवसाय : उद्योग पक्ष : भारतीय जनता पक्ष मतदारसंघ : 152-बोरीवली
इतर माहिती : 1995 ते 1999 आणि 2002 ते 2011 या कालावधीत महाराष्ट्र
भाजपाचे सरचिटणीस. २००२-२००८ महाराष्ट्र विधानपरिषदेचे
सदस्य. २००८ मध्ये विधानपरिषदेवर फेरनिवड. २३ डिसेंबर २०११
रोजी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपदी निवड. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संचालक मंडळाचे सदस्य.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी.
श्री.प्रकाश मंछुभाई मेहता
जन्म ठिकाण : घाटकोपर, जिल्हा मुंबई
शिक्षण : एस.एस.सी.
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी, इंग्रजी व गुजराथी
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती किशोरी
अपत्ये : एकूण २ (दोन मुलगे)
व्यवसाय : व्यापार
पक्ष : भारतीय जनता पक्ष
मतदारसंघ : १७०-घाटकोपर (पूर्व), जिल्हा मुंबई उपनगर
इतर माहिती : बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य;१९९९ संस्थापक, जैन जागृती सेंटर, पंतनगर; चेअरमन, जागृती ग्रुप, घाटकोपर;
सल्लागार, युथ फोरम ट्रस्ट, चिराग युथ फाउंडेशन व संस्थापक, घाटकोपर
एज्युकेशन अँड चॅरिटेबल संस्था, १९७५ स्व. जयप्रकाश नारायण यांच्या
आंदोलनात सहभाग; मे १९९५ ते ऑगस्ट १९९६ गृहनिर्माण, गलिच्छ वस्ती सुधार, घरदुरुस्ती व पुनर्बांधणी, नागरी कमाल धारणा व सेवायोजन राज्यमंत्री; ऑगस्ट १९९६ ते जून १९९७ ग्राहक संरक्षण, विशेष सहाय्य आणि पर्यटन खात्याचे मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री;
जून १९९७ ते जुलै १९९९ राज्य उत्पादन शुल्क व विशेष सहाय्य खात्याचे
मंत्री व ऑगस्ट १९९६ ते ऑक्टोबर १९९९ मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री;
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत फेरनिवड.
श्री.चंद्रकांत बच्चू पाटील
श्रीमती पंकजा गोपिनाथराव मुंडे-पालवे
जन्म : २६ जुलै १९७९
जन्म ठिकाण : परळी, तालुका परळी, जिल्हा बीड
शिक्षण : बी.एस्सी., एम.बी.ए. (३ सेमिस्टर)
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी
वैवाहिक माहिती : विवाहित, पती श्री. चारुदत्त (अमित)
अपत्ये : एकूण १ (एक मुलगा)
पक्ष : भारतीय जनता पक्ष
मतदारसंघ : 233 - परळी, जिल्हा बीड
इतर
माहिती : वैद्यनाथ सर्वांगीण विकास
संस्थेमार्फत शाळा, महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अभियांत्रिकी
महाविद्यालय सुरु केले; महिलांच्या आर्थिक उन्नतीकरीता बचत गट स्थापन केले, त्या माध्यमातून महिलांना रोजगार व अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले;
भटक्या, विमुक्त व इतर मागास समाजातील तसेच आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना
सतत सहाय्य, ऊसतोड कामगारांच्या उन्नतीसाठीही प्रयत्न केले; संचालक, पंडित दिनदयाळ उपाध्याय सहकारी बँक व पन्नगेश्वर सहकारी साखर कारखाना लि.; ऑक्टोबर २००९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवड.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत फेरनिवड.
श्री. विष्णु रामा सावरा
जन्म : 1 जून 1950
जन्म ठिकाण : गालतरे, तालुका-वाडा, जिल्हा ठाणे. शिक्षण : बी. कॉम. ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती जयश्री. अपत्ये : एकूण 3 (दोन मुलगे व एक मुलगी) व्यवसाय : शेती. पक्ष : भारतीय जनता पक्ष मतदारसंघ : 134-भिवंडी ग्रामीण (अनुसूचित जमाती), जिल्हा-ठाणे इतर माहिती : स्टेट बँकेत नोकरी, अध्यक्ष, अरविंद स्मृती ठाणे, या संस्थेमार्फत अरविंद आश्रमशाळा दादडे, तालुका विक्रमगड, जिल्हा ठाणे, माधवरा काणे आश्रमशाळा, देवगाव, तालुका वाडा, जिल्हा ठाणे व अनु. आश्रमशाळा नांदणी, गायगोठा, तालुका वाडा, जिल्हा ठाणे सुरु केली, उपाध्यक्ष, छत्रपती शिक्षणमंडळ कल्याण, जिल्हा ठाणे, चिटणीस, प्रगती प्रतिष्ठान, ठाणे अध्यक्ष, उत्कर्ष नागरी सहकारी पतपेढी, वाडा, जिल्हा ठाणे, शेतकरी, कामगार व आदिवासींच्या प्रश्नांसाठीच्या आंदोलनात सहभाग, चिटणीस, भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश, अध्यक्ष, फेब्रुवारी 1999 ते ऑक्टोबर 1999 आदिवासी विकास मंत्री;
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत फेरनिवड.
श्री. दिलीप ज्ञानदेव कांबळे
जन्म : 1 जून, 1962
जन्म ठिकाण : पुणे
शिक्षण : बी.ए.
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी
वैवाहिक माहिती : पत्नी, सौ. मीलन
अपत्ये : 3 (२ मुले व 1 मुलगी)
व्यवसाय : समाजकारण
पक्ष : भारतीय जनता पक्ष
मतदारसंघ : 214-पुणे कॅटोनमेंट
इतर माहिती : 1995 मध्ये युतीच्या काळात पुणे शहरातील पर्वती मतदारसंघातून
विजयी. युतीच्या काळात समाजकल्याण राज्यमंत्री. सर्व सामान्यांना
मदत करण्यास अग्रेसर. नवनवीन उपक्रम राबविण्यास आघाडीवर.
त्यांच्या कार्यशैलीमुळे समाजात लोकप्रिय.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत फेरनिवड.
श्रीमती विद्या ठाकूर
1992
ते 2012 या कालावधीत मुंबई महानगरपालिकेत नगरसेविका. 1995-1996 व
2002-2003 सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्ष. 2007 ते 2008 या कालावधीत
मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौर.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी. | ||||||||||||||||||

0 Comments