लोकशाही व प्रशासनावरील विश्वास टिकण्यासाठी भ्रष्टाचार निर्मूलनाची गरज - राज्यपाल

बातमी                 मुंबई : भ्रष्टाचाराचा नागरिकांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे परिणाम होत असतो. त्यामुळे जनतेचा लोकशाही व प्रशासन यांच्यावरील विश्वास टिकून राहण्यासाठी भ्रष्टाचाराचे कायमस्वरुपी निर्मूलन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले. भ्रष्टाचारामुळे सामाजिक आणि आर्थिक विकासाचे फायदे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि त्यामुळे विषमता वाढीस लागते, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

            राज्यात 27 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर, 2014 या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ पाळण्यात येत आहे. या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. राज्यपालांनी यानिमित्त अधिकारी/कर्मचारी यांच्या समोर संदेशाचे वाचन केले आणि त्यांना एकात्मता व पारदर्शकता यांची शपथ दिली.

Post a Comment

0 Comments