मुंबई
: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी शिवाजी पार्क, दादर येथील
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमीस भेट देवून डॉ. आंबेडकर यांच्या
अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह
उपस्थित मंत्र्यांनीही डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर सामूहिक वंदना केली.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, चैत्यभूमी परिसर सुशोभिकरण कालबद्ध
पद्धतीने करण्याबाबत आराखडा तयार करण्यात येईल व हे काम जलदगतीने पूर्ण
करण्यात येईल.
यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य विनोद तावडे, प्रकाश मेहता, श्रीमती पंकजा
मुंडे, श्रीमती विद्या ठाकूर, दिलीप कांबळे तसेच आमदार ॲड. आशिष शेलार, भाई
गिरकर, उपमहापौर अलका केरकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त सीताराम कुंटे आदी
उपस्थित होते.
0 Comments