पंढरपूर लाईव्ह साठी-शंतनु शेळके
सध्या विधानसभेचा निकाल लागल्यानंतर प्रथमच मी असले
राजकारण पाहतोय.कोणाच काय चाललाय आणि कोणाच काय हे कोणालाच कळत
नाहीये.अशातच अनेक नेत्यांनी आपल्याच पक्षावर टीका केली तर कोणी कोणाची
उणीव भासल्याचे सांगितले या महिन्यात अनेक बदल आणि झटक्याची विधान पहावयास
मिळाली त्यामधीलच काही ठराविक विधानं. या विषयावरच आमचा हा सखोल आणि
छोटासा रिपोर्ट...!
राजनाथ सिंह - राज्यात 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर एका सभेत बोलताना राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रात ‘महापरिवर्तन’ होण्याची गरज असल्याचं म्हटल होत. ‘बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही खूप सन्मान करत होतो. आज बाळासाहेब जिवंत असते तर सेना-भाजप युती तुटलीच नसती’ असं म्हणतच त्यांनी लोकांना भाजपला मत देण्याचं आवाहन केलं होत.आणि ते आव्हान लोकांनी स्वीकारलं कि नाही
ते तुम्हाला तर कळालच......
राज ठाकरे - पहिले राजनाथ सिंह यांचे विधान वाचल्यानंतर आपल्याला हे विधान ऐकल्यावर थोडा धक्का बसेल कारण विधान तस आहे.राज्यातील युती तुटल्यावर शिवसेनेने केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी शिवसेनेचा अपमान करणा-या भाजपला लाथाडले असते शिवसेनेच्याऐवजी मी असतो तर कधीच भाजपला लाथाडले असते. भाजपने शिवसेनेचा अपमान केला आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांनीही भाजपला लाथाडलेच असते .
एकनाथ खडसे -आता हे विधान वाचा तुम्ही... हे विधान वाचल्यावर म्हणाल कि स्वत: स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. एकनाथ खडसे भाजपचे...मुख्यमंत्री भाजपचा...टीका करतायत कोणावर
भाजपवर...आता करा विचार तुम्हीच...राज्यात भाजपची सत्ता आली याचा आनंद आहे. पण, राज्याचे मुख्यमंत्री बहुजन समाजाचे असायला हवे होते. यावर लिहिण्यासारखे अजून खुप आहे... मात्र आत्ता थांबतो... बोलु पुन्हा कधी तरी...
------------------------------------------------------------------------------------
वाह रे प्रभू.....................
- पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या मंत्रिमंडळात स्थान पटकावणारे सुरेश प्रभू यांनी रविवारी सकाळी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपामध्ये प्रवेश केला.
- शिवसेनेचे माजी खासदार सुरेश प्रभू यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन भाजपाने शिवसेनेला शह दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
- २००९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसकडून पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर प्रभू हे शिवसेनेचे सदस्य असले तरी ते सक्रीय राजकारणात नव्हते.
------------------------------------------------------------------------------------
मित्रांनो हे असे राजकारण असतेय.त्यामुळे सगळ करा
पण राजकारणापासून दोन हात लांब रहा.....
----------------------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पंढरपूरचे पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी महाराष्ट्राच्या कानाकोर्यातून विविध भागातील ताज्या बातम्या पाठविणेसाठी प्रतिनिधी नेमणे आहेत... या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्या तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...-संपादक :- भगवान गणपतराव वानखेडे
सा.झंझावात, पंढरपूर लाईव्ह
मोबा. 8055434499, 8308838111, 8552823399
कृपया इच्छूकांनी आपले अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या संपुर्ण बायोडाटासह
livepandharpur@gmail.com jhanjavat@gmail.com
या मेल आय डी वर ई-मेल करावेत.
ताज्या घडामोडी साठी बघत रहा....
www.pandharpurlive.com
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

0 Comments