पंढरपूर लाईव्ह साठी-शंतनु शेळके
मेरे खून का कतरा, कतरा.. देश को एक रखेगा’....
आज जीवित हूं, शायद कल नही रहुंगी,
लेकीन मेरे खून का कतरा, कतरा
देश को एक रखने में हमेशा काम आयेगा..’
30 ऑक्टोबर 1984.. ओरिसामधील भुवनेश्वर येथे इंदिराजींची जाहीर सभा सुरू
होती. उद्या ओढवणा-या मरणाचा मागोवाच जणू काही त्या घेत होत्या आणि
त्यांच्या तोंडून भविष्यवाणीच व्यक्त झाली. आज मी जीवित आहे, उद्या नसेन.. असे
नियतीनेच त्यांना सांगितले असावे. ज्यांनी देशाच्या पंतप्रधानांचे रक्षण
करावयाचे, त्यांनीच पंतप्रधानांवर गोळ्या झाडायच्या म्हटले तर या देशात
कोणालाही मारणे अगदी शक्य आहे. पण इंदिराजींना ही चाहूल लागली होती.
त्यांना सांगण्यातही आले होते की, तुमच्या सुरक्षा व्यवस्थेतील दोन शीख
तरुण घातपात करू शकतात. त्यांना दूर करा.’ इंदिराजींनी या सूचनेला नकार
दिला. कोणा जातीधर्माच्या व्यक्तीला मी या देशाची पंतप्रधान म्हणून तो शीख
आहे म्हणून’ बाजूला करीन तर मला पंतप्रधान म्हणून राहण्याचा अधिकार राहणार
नाही, असे सांगून इंदिराजींनी आपली हत्या करणा-या मारेक-यांना जणू अभयच
दिले होते. इंदिराजी भुवनेश्वरहून रात्री परतल्या. 31 ऑक्टोबर 1984
सकाळचा तो काळा दिवस उजाडला आणि साडेनऊ वाजता बेयंत सिंग याने देशाच्या
पंतप्रधानांवर गोळ्या चालवल्या.. सगळा देश हादरला. आदल्याच दिवशी इंदिराजी
म्हणाल्या होत्या.. मैं आज जीवित हूँ, शायद कल नही रहूंगी... इंदिराजी
जिवंत राहिल्या नाहीत, पण त्यांच्या रक्ताचा थेंब आणि थेंब - कतरा, कतरा
देशाच्या ऐक्याला शक्ती देण्याकरिता कायमचा मजबूत राहिला.
सोनार बांगलादेशात इंदिराजींची पुण्यतिथी साजरी झाली आहे. त्यांनीच या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. 1971ची लढाई मुजबूर रेहमान यांनी बांगलादेशाच्यावतीने लढवली. त्याची सर्व शक्ती श्रीमती इंदिराजी होत्या. या देशाला अन्नधान्याच्या आघाडीवर स्वावलंबी करण्यात इंदिराजींचा फार मोठा वाटा आहे. 1970 साली त्या अमेरिकेत गेल्या असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी हिंदुस्थानला जहाजातून रवाना होत असलेला गहू इंदिराजींना दाखवला होता. त्यावेळी काहीसे अपमानित होऊन देशाला स्वयंपूर्ण करण्याची शपथ घेतली. त्यानंतरच शेतीला समृद्धी देणारा थळ-वायशेत येथील प्रचंड खत कारखाना इंदिराजींनीच उभा केला. 8 हजार कोटी रुपयांचा खर्च करून या कारखान्याची निर्मिती झाली आणि देश स्वयंपूर्ण होण्याची वाटचाल सुरू झाली.
एशियाड खेळांची देणगीही इंदिराजींनीच या देशाला दिली आहे. भारत जागतिक पातळीवरच्या कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करू शकतो, याचा विश्वास याच क्रीडा स्पर्धानी देशाला दिला. ही देणगी इंदिराजींचीच आहे. रंगीत दूरदर्शन संच आणि एसएलव्ही-3 सॅटेलाईट यासाठी श्रीहरीकोटा येथील अवकाश संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ ए. पी. जे. अब्दुल कलाम, सतीश धवन यांना सगळे प्रोत्साहन इंदिराजींनी दिले होते आणि आजचा सगळा लाईव्ह खेळ हीसुद्धा इंदिराजींचीच फार मोठी देणगी आहे.
1972 साली आकाशात झेपावलेला आर्यभट ही सुद्धा इंदिराजींनी तंत्र विज्ञानाला जो फार मोठा पाठिंबा दिला आणि त्यासाठी प्रचंड आर्थिक तरतूद करून दिली, हे श्रेय इंदिराजींचेच आहे. श्रीमती इंदिराजी पंतप्रधान झाल्या तेव्हा श्री. मधु लिमये यांनी लोकसभेत त्यांचे वर्णन गुंगी गुडिया’ असे केले होते. ती सर्व टीका झेलून इंदिराजींनी देशाला समर्थपणे उभे केले आणि त्यावेळचे विरोधी पक्ष नेते अटलबिहारी वाजपेयी यांना 1971च्या बांगलादेश युद्धातील विजयानंतर या गुंगी गुडिया’चे वर्णन रणचंडिका’, दुर्गा’, रणरागिणी’ अशा शब्दांत करावे लागले होते.
एशियाड खेळांची देणगीही इंदिराजींनीच या देशाला दिली आहे. भारत जागतिक पातळीवरच्या कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करू शकतो, याचा विश्वास याच क्रीडा स्पर्धानी देशाला दिला. ही देणगी इंदिराजींचीच आहे. रंगीत दूरदर्शन संच आणि एसएलव्ही-3 सॅटेलाईट यासाठी श्रीहरीकोटा येथील अवकाश संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ ए. पी. जे. अब्दुल कलाम, सतीश धवन यांना सगळे प्रोत्साहन इंदिराजींनी दिले होते आणि आजचा सगळा लाईव्ह खेळ हीसुद्धा इंदिराजींचीच फार मोठी देणगी आहे.
1972 साली आकाशात झेपावलेला आर्यभट ही सुद्धा इंदिराजींनी तंत्र विज्ञानाला जो फार मोठा पाठिंबा दिला आणि त्यासाठी प्रचंड आर्थिक तरतूद करून दिली, हे श्रेय इंदिराजींचेच आहे. श्रीमती इंदिराजी पंतप्रधान झाल्या तेव्हा श्री. मधु लिमये यांनी लोकसभेत त्यांचे वर्णन गुंगी गुडिया’ असे केले होते. ती सर्व टीका झेलून इंदिराजींनी देशाला समर्थपणे उभे केले आणि त्यावेळचे विरोधी पक्ष नेते अटलबिहारी वाजपेयी यांना 1971च्या बांगलादेश युद्धातील विजयानंतर या गुंगी गुडिया’चे वर्णन रणचंडिका’, दुर्गा’, रणरागिणी’ अशा शब्दांत करावे लागले होते.
आज त्या इंदिराजींना देश विसरला का?
मोदी युग सुरू झाले आणि नेहरूंना गोळ्या का घातल्या गेल्या नाहीत, याची चर्चा उघडपणे होऊ शकली. गांधी, नेहरू ही नावे, त्यांचा विचार पुसण्याचा विडा उचललेल्या मोदी आणि त्यांच्या सरकारला 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी हातात झाडू घेऊन सफाई अभियान करावे लागले. ते नाटकच होते. पण त्या नाटकासाठी महात्मा गांधी जयंतीचा मुहूर्त शोधावा लागला. 12 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींना ना 2 ऑक्टोबर आठवला, ना झाडू आठवला, ना साबरमती नदी स्वच्छ करावीशी वाटली, ना साबरमती आश्रमाला त्यांनी कधी भेट दिली. पंतप्रधान झाल्यावर ही नाटके मोदींनी सुरू केली. पण ती नाटके आहेत, हे आता लोकांना झपाटयाने कळू लागले आहे. सरदार पटेल यांच्यासारख्या महान नेत्याची आठवण गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या मोदींना 12 वर्षेे झाली नव्हती. 31 ऑक्टोबरची इंदिराजींची आठवण पुसण्याकरिता सरदार पटेल जयंतीचा मोदी आणि त्यांच्या सरकारने खुबीने वापर केला. पटेल यांचे मोठेपण देशाने मान्यच केले आहे. पण गांधी, नेहरू घराण्याचे मोठेपण अमान्य करून ते पुसून टाकण्याचे नाटक मोदी करत आहेत, हे देशाला कसे पटेल?
- काळाचा महिमा जसा अगाध असतो, तसा सत्तेचा महिमाही अगाधच आहे. देशासाठी बलिदान देणा-या श्रीमती इंदिरा गांधी यांची आठवण त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त ना सरकारला झाली, ना जनतेला झाली... एक दैनिक ‘प्रहार’चा अपवाद सोडला तर श्रीमती इंदिराजींच्या ३०व्या स्मृतिदिनाची दखल कोणी म्हणता कोणीसुद्धा घेतलेली नाही.
- काँग्रेसचे सरकार असताना निदान इंदिराजींच्या स्मृतिदिनी जाहिरात प्रसिद्ध व्हायची. आज केंद्रात काँग्रेसचे सरकार नाही. पण, अखिल भारतीय काँग्रेस किंवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे स्मृतिदिनाची जाहिरात द्यायला काय अडचण होती? महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयात दुपारी १२ वाजता अध्यक्ष माणिकराव ठाकरे आल्यानंतर इंदिराजींची पुण्यतिथी साजरी झाली. पण हा सगळा उपचार होता. अतिशय कठीण काळात देशाला समर्थपणे उभे करणा-या इंदिराजींना देश विसरला. अशीच मनाला टोचणी आहे.
पंढरपूरचे पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी महाराष्ट्राच्या कानाकोर्यातून विविध भागातील ताज्या बातम्या पाठविणेसाठी प्रतिनिधी नेमणे आहेत... या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्या तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...
-संपादक :- भगवान गणपतराव वानखेडे
सा.झंझावात, पंढरपूर लाईव्ह
मोबा. 8055434499, 8308838111, 8552823399
कृपया इच्छूकांनी आपले अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या संपुर्ण बायोडाटासह
livepandharpur@gmail.com jhanjavat@gmail.com
या मेल आय डी वर ई-मेल करावेत.
ताज्या घडामोडी साठी बघत रहा....
www.pandharpurlive.com
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


0 Comments