पंढरपूर लाईव्ह:- पंढरपूर येथील श्रीसंत काशीबा महाराज मंदिर गुरव समाज मठाचे मठाधिपती श्री.ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज गुरव यांना औरंगाबाद जिल्हा गुरव समाजातर्फे महापौर कला ओझा यांचे हस्ते व समाजाचे अध्यक्ष स.सो. खंडाळकर व हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत ‘समाजभुषण’ हा पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. यावेळी प्रमुख संस्थेचे अध्यक्ष दिलीपभाऊ गुरव, आ.प्रदीप जैस्वाल, किशोर नागरे, नगरसेवक व बहुसंख्येने समाजबांधव उपस्थित होते.
ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज गुरव हे विविध सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. आपल्या मठामध्ये वारकरी सांप्रदायातील सांप्रदायीक शिक्षण घेणार्या मुलांसाठी दररोज सायंकाळी मधुकरी (जेवणाची व्यवस्था) त्यांनी केलेली आहे. तसेच त्यांच्या ‘माऊली ग्रुप’ च्या वतीने ही विविध समाजोपयोगी कार्यक्रम सातत्याने राबविले जातात. पंढरपूरमधील ‘पालवी’, ‘मातोश्री वृध्दाश्रम’ वगैरे विविध सामाजीक संस्थांमध्ये सणा-सुदीच्या काळात खाऊ वाटप आदी उपक्रम राबविले जातात. तसेच ऊन्हाळ्यामध्ये पंढरपूर मधील मार्केट यार्ड शॉपींग सेंटर येथे ‘पुणेकर कुशन्स्’ समोर दरवर्षी पाणपोईची सोय त्यांच्या हस्ते केली जाते. त्यांच्या समाजकार्याची व धार्मीक कार्याची दखल घेवून त्यांना वरील पुरस्कार प्रदान करण्यात आलेला असून त्यांच्या या सन्मानाप्रित्यर्थ विविध स्तरातून तसेच गुरव समाजातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
सा.झंझावात आणि पंढरपूर लाईव्ह परिवाराकडूनही त्यांचे अभिनंदन..!
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी... विविध उद्योजक, व्यापारी व संस्था आता
आपल्या जाहिराती पंढरपूर लाईव्हसाठी देवू शकतात... तसेच वाढदिवस वगैरे
शुभेच्छा जाहिराती व विविध समारंभाच्या आमंत्रणाच्या जाहिराती सुध्दा आपण
पंढरपूर लाईव्ह वर देवू शकता...
आपल्या जाहिराती पाठविण्यासाठी खालील ई-मेल आय डी वर संपर्क साधावा...
livepandharpur@gmail.com jhanjavat@gmail.com
मोबा. 8055434499, 8308838111, 8552823399
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
पंढरपूरचे
पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी
महाराष्ट्राच्या
कानाकोर्यातून विविध भागातील ताज्या बातम्या पाठविणेसाठी
प्रतिनिधी नेमणे आहेत...
या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्या
तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...
-संपादक :- भगवान गणपतराव वानखेडे
सा.झंझावात, पंढरपूर लाईव्ह
मोबा. 8055434499, 8308838111, 8552823399
कृपया इच्छूकांनी आपले अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या संपुर्ण बायोडाटासह
livepandharpur@gmail.com jhanjavat@gmail.com
या मेल आय डी वर ई-मेल करावेत.
या मेल आय डी वर ई-मेल करावेत.
ताज्या घडामोडी साठी बघत रहा....
www.pandharpurlive.com

0 Comments