हमाल मापाडी महामंडळ विविध मागण्यांसाठी करणार दिल्लीत आंदोलन ; हमाल मापाडी महामंडळाच्या पंढरीतील बैठकीत निर्णय

पंढरपूर लाईव्ह:-
देशातील सर्व असुरक्षित कामगारांना पेन्शन लागू करण्यात यावी, लोकपाल नियुक्त करण्यात यावा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायम ठेवावी यासह इतर मागण्यांसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी देशभरातील कष्टकर्‍यांच्यावतीने जंतर-मंतर वर आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी दिली. महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाची विशेष बैठक येथील हमाल भवन येथे संपन्न झाली यावेळी ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना डॉ. आढाव म्हणाले की, देशात सुमारे 10 कोटी लोक हे असुरक्षित कामगार म्हणून राबत आहेत. मात्र त्यांना वृद्धापकाळासाठी कोणतीही सुरक्षीतता मिळत नाही याकरिता सर्व असुरक्षित कष्टकर्‍यांना 2 हजार रूपये दरमहा निवृत्ती वेतन मिळावे याकरिता राज्य आणि केंद्र सरकारने विशेष तरतूद करावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. गेल्या वर्षी दिल्लीत यासंदर्भात देशभरातील कष्टकरी संघटनांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यानंतर पुन्हा एकदा येत्या 2 डिसेंबर रोजी जंतर-मंतर येथे आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील सर्व केंद्रातून हजारो कष्टकर्‍यांनी हजर रहावे असे आवाहन केले.

राज्य सरकारकडे हमाल, मापाडी महामंडळांच्या माध्यमातून पी.एङ्ग.च्या माध्यमातून 1 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम पडून आहे. हा पैसा बीनव्याजी स्वरूपात व्यापारी वापरत आहेत. त्या पैशातून कष्टकर्‍यांना निवृत्त वेतन देणे शक्य असल्याचे सांगून केंद्र सरकारने परदेशी उद्योजकांसाठी लाल गालिचे अंथरण्यापेक्षा देशातील श्रीमंत देवस्थानसाठी लाल गालिचे अंथरावेत आणि त्यांच्याकडे पडून असलेला हजारो कोटी रूपयांचा निधी  देशाच्या विकासाकरिता वापरावा असेही आवाहन डॉ. आढाव  यांनी यावेळी केले. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. हरिष धूरात, खजिनदार नवनाथ बिनवडे, सहखजिनदार राजकुमार घायाळ, विकास मगदूम, आप्पासाहेब खताळ, रमझानखान पठाण, पुणे जिल्हाध्यक्ष गोरख मेंगडे यांच्यासह, सुरेश बागल, नागनाथ खंडागळे,ताजुद्दीन शेख, बप्पा चव्हाण, शिव पुजारी, पांडूरंग साबळे, दत्ता विरपे  सर्व जिल्हा शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते. सुरूवातीला जवखेडे येथील हत्याकांडात मयत झालेल्या तसेच पिंपरी चिंचवड येथे ड्रेनेजमध्ये काम करताना मयत झालेल्या दोन युवकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. हमाल पंचायतचे पंढरपूर तालुकाध्यक्ष मारूती बंदपट्टे, सुरेश खटके, विष्णू शेंडे, हरिभाऊ कोळी, उत्तरेश्‍वर गोङ्गणे, संतोष सावंत, आबासाहेब शिंदे यांनी यावेळी परिश्रम घेतले.  प्रास्ताविक हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी केले तर आभार जिल्हा सचिव नवनाथ पोरे यांनी मानले.


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी...  विविध उद्योजक, व्यापारी व संस्था आता आपल्या जाहिराती पंढरपूर लाईव्हसाठी देवू शकतात... तसेच वाढदिवस वगैरे शुभेच्छा जाहिराती व विविध समारंभाच्या आमंत्रणाच्या जाहिराती सुध्दा आपण पंढरपूर लाईव्ह वर देवू शकता...

आपल्या जाहिराती पाठविण्यासाठी खालील ई-मेल आय डी वर संपर्क साधावा...

livepandharpur@gmail.com                  jhanjavat@gmail.com
  मोबा. 8055434499,  8308838111,  8552823399 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
पंढरपूरचे  पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी 
महाराष्ट्राच्या कानाकोर्‍यातून विविध भागातील ताज्या  बातम्या पाठविणेसाठी  

प्रतिनिधी नेमणे आहेत...  

या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्‍या तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...
-संपादक :- भगवान गणपतराव वानखेडे
सा.झंझावात, पंढरपूर लाईव्ह
मोबा. 8055434499, 8308838111, 8552823399
कृपया इच्छूकांनी आपले अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या संपुर्ण बायोडाटासह
livepandharpur@gmail.com               jhanjavat@gmail.com

 या मेल आय डी वर ई-मेल करावेत.
ताज्या घडामोडी साठी बघत रहा....
  www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments