लावणीकार रविराज सोनार यांचा लावणीसंग्रह ‘ऑनलाईन डिजीटल लायब्ररीत’

            पंढरपूर लाईव्ह:- पंढरपूर येथील अल्पावधीत लोकप्रिय झालेले लावणीकार रविराज सोनार यांचे दोन लावणीसंग्रह आत्ता एका क्लीकसरशी जगभरात कोठेही संगणक, मोबाईल अथवा टॅबवर बुकस्वरुपात वाचावयास मिळणार आहेत.

           
    भारतातील अग्रगण्य अशा फ्यूजीसॉप्ट या सॉप्टवेअरने जगभरातील मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेच्या साहित्य रसिकांना वेगवेगळ्या साहित्यीकांची वेगवेगळ्या प्रकारची निरनिराळ्या प्रकारची पुस्तके वाचावयाला उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाईन डिजीटल लायब्ररी सुरु केली आहे. या लायब्ररीमध्ये महाराष्ट्रातील निवडक अशी मराठी, हिंदी व इंग्रजी अशी सुमारे 900 पुस्तके अपलोड करण्यात आली असून त्यामध्ये पंढरपूरचे साहित्यीक व शब्दांकुर साहित्य अकादमीचे संस्थापक अध्यक्ष लावणीकार रवीराज सोनार यांच्या रंगमहाल व विषय सुखाचा सुवर्णक्षण या 2 बहूचर्चित व बहुश्रूत लावणीसंग्रहाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जगभरातील मराठी साहित्य रसीक तसेच लावणीप्रेमी यांना एका क्लीकसरशी रविराज सोनार यांच्या बहुरंगी व बहुढंगी लावण्या www.sahityasampda.com या संकेतस्थळावर वाचता येणार आहेत.
           फ्यूजीसॉप्ट या सॉप्टवेअरच्या या ऑनलाईन डिजीटल लायब्रेरीच्या उपक्रमात रविराज सोनार यांना बहुमान मिळाल्याने साहित्यक्षेत्रातील जाणकारांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी...  विविध उद्योजक, व्यापारी व संस्था आता आपल्या जाहिराती पंढरपूर लाईव्हसाठी देवू शकतात... तसेच वाढदिवस वगैरे शुभेच्छा जाहिराती व विविध समारंभाच्या आमंत्रणाच्या जाहिराती सुध्दा आपण पंढरपूर लाईव्ह वर देवू शकता...

आपल्या जाहिराती पाठविण्यासाठी

खालील ई-मेल आय डी वर संपर्क साधावा...

livepandharpur@gmail.com                  jhanjavat@gmail.com

  मोबा. 8055434499,  8308838111,  8552823399 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

पंढरपूरचे  पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी 

महाराष्ट्राच्या कानाकोर्‍यातून विविध भागातील ताज्या  बातम्या पाठविणेसाठी  

प्रतिनिधी नेमणे आहेत...  

या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्‍या तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...

-संपादक :- भगवान गणपतराव वानखेडे

सा.झंझावात, पंढरपूर लाईव्ह

मोबा. 8055434499, 8308838111, 8552823399

कृपया इच्छूकांनी आपले अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या संपुर्ण बायोडाटासह

livepandharpur@gmail.com               jhanjavat@gmail.com

 या मेल आय डी वर ई-मेल करावेत.

ताज्या घडामोडी साठी बघत रहा....

  www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments