डेंग्यूची दहशत
सोलापुरात डेंग्यू रुग्णाची वाढ काळजीचे कारण झाले असतानाच डास पैदाशीस मनपा पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कारणीभूत ठरत आहे. तसेच हवामानातील बदलातून थंडीतापाचे रुग्ण वाढत असून ते डेंग्यूच्या जाळ्यात सापडत आहेत. रविवारी एका दिवसात सहाजणांना डेंग्यूची बाधा झाल्याची माहिती पुढे आली आहे. शिवाय आणखी पाच रुग्णांचे रक्त तपासणीसाठी एनआयव्हीकडे सोमवारी पाठविण्यात आले. गेल्या आठवड्यात २९ संशयित रुग्ण आढळले, त्यांच्या रक्ताची तपासणी एनआयव्हीकडून केली असता त्यापैकी सहाजणांना डेंग्यूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
सोलापुरात तीन दिवसाआड पाणी पुरवठा होतो, त्यामुळे
नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याशिवाय पर्याय नाही. घरात आणि परिसरात
उघड्यावरील साचलेल्या पाण्यातून डासांची पैदास होत असून त्यामाध्यमातून
रुग्णांची वाढ होत आहे. घरात पाणी न साठवता टाकून द्या, अशी सूचना पुढे आली
आहे. पण हा सारा प्रकार गुंतागुंतीचा झाला असून जीवावर बेतण्याची भीती
आहे.. डास चावल्यावर 3 ते 10 दिवसांत थंडीताप, खूप अंगदुखी, सांधेदुखी,
डोकेदुखी, इ. त्रास सुरू होतो. या विषाणूंना खास औषध नाही.डेंग्यूवर
कोणताही नेमका औषधोपचार उपलब्ध नाही. तापासाठी पॅरासिटॅमाल, भरपूर पाणी
पिणे, विश्रांती, लक्षणेनुसार उपचार करणे आहे.सदर डासांची उत्पत्ती
साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. रांजणातील पाणी, सिमेंटच्या टाक्यातील
पाणी, इमारतीवरील टाक्यातील पाणी, घरासभोवतालच्या टाकावू वस्तू उदा.
प्लॅस्टीकच्या बादल्या, रिकाम्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या, निरुपयोगी
टायर्स इत्यादीमध्ये कोणतेही पाणी आठ दिवसांपेक्षा जास्त साठवून ठेवल्यास
डास अंडी घालून उत्पत्ती होते. तेव्हा अशा निरुपयोगी वस्तुमध्ये पाणी
साठणार नाही याची खबरदारी घ्यावी. पाण्याची भांडी, ड्रम, रांजण व्यवस्थित
झाकून ठेवावेत. पाण्याची भांडी झाकल्याने त्यात डास अंडी घालू शकत नाहीत.
तसेच अंड्यांची वाढ होण्यासाठी हवा, प्रकाश मिळू शकत नाही. घरांवरील
टाक्यांना झाकणे बसवावीत. शौचालयाच्या व्हेंटपाईपला जाळी बसवावीत.
आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस पाळावा. परिसरातील डबकी वाहती करणे,
बुजविणे, मोठ्या डबक्यात गप्पी मासे सोडणे महत्वाचे आहे.जे कंटेनर रिकामे
करता येणार नाहीत, उदा. सिमेंटचे कंटेनर अशा कंटेनरमध्ये टेमिफॉस या
अळीनाशकाचा वापर करवा.एडिस डास अळी शोधण्यासाठी घरातील व घरासभोवतालचे पाणी
साठे तपासून गृह निर्देशांक काढण्यात येतो. पाणी साठे मोकळे करावेत, परंतु
ते गटारात न ओतता जमिनीवर ओतावे. पाणीसाठा मोकळा करणे शक्य नसल्यास त्यात
अळी नाशकाचा वापर करावा. पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्यास पाणी गाळून घेऊन ते
पाणी पुन्हा वापरावे. तत्पूर्वी ते भांडे स्वच्छ फडक्याने घासून पुसून
ठेवावे.
कसा ओळखाल डेंग्यू झालाय ?
हा आजार साथीने येतो, त्यामुळे तो ओळखणे सोपे असते. साथीच्या सुरुवातीस मात्र थोडे रुग्ण असल्याने ओळखणे थोडे अवघड जाते.साधारणपणे हा आजार 5 ते 7 दिवसांत आपोआप बरा होतो. पण काही जणांना रक्तस्रावाचा त्रास सुरू होतो. हिरडया, नाक, जठर, आतडी यांतून रक्तस्राव व्हायला सुरुवात होते. जठरातून रक्तस्राव झाल्यास उलटीत रक्त दिसते. आतडयातून रक्तस्राव झाल्यास विष्ठा काळसर दिसते. त्वचेवर रक्ताचे बारीक ठिपके दिसतात. प्रत्यक्ष रक्तस्राव व्हायच्या आधी पण हा दोष ओळखता येतो.डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणुमुळे होतो. डेंगूचा प्रसार एडिस एजिप्टाय नावाच्या डासाच्या मादीमुळे होतो. तीव्र ताप, डोकेदुखी, उलटी, अंगदुखी, अंगावर लालसर रॅश/पुरळ, तीव्र पोटदुखी, गंभीर रुग्णास प्लेटलेट कमी झाल्याने रक्तस्त्राव होतो.
पंढरपूरचे पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी महाराष्ट्राच्या कानाकोर्यातून विविध भागातील ताज्या बातम्या पाठविणेसाठी प्रतिनिधी नेमणे आहेत... या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्या तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...
-संपादक
भगवान गणपतराव वानखेडे
सा.झंझावात,
पंढरपूर लाईव्ह
मोबा. 8055434499
8308838111
8552823399
कृपया इच्छूकांनी आपले अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या संपुर्ण बायोडाटासह
livepandharpur@gmail.com
jhanjavat@gmail.com
या मेल आय डी वर ई-मेल करावेत.
ताज्या घडामोडी साठी बघत रहा....www.pandharpurlive.com
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी
विविध उद्योजक, व्यापारी व संस्था आता आपल्या जाहिराती पंढरपूर लाईव्हसाठी देवू शकतात...
तसेच वाढदिवस वगैरे शुभेच्छा जाहिराती व विविध समारंभाच्या आमंत्रणाच्या जाहिराती सुध्दा आपण पंढरपूर लाईव्ह वर देवू शकता...
आपल्या जाहिराती पाठविण्यासाठी
खालील ई-मेल आय डी वर संपर्क साधावा...livepandharpur@gmail.com
jhanjavat@gmail.com
मोबा. 8055434499
8308838111
8552823399

0 Comments