* विशेष मोहीमही ठरली सपशेल फोल.
* स्वच्छता अभियानाचा फुगा फुटला.
* प्रसाधनगृहाला टाळे महिलांचे हाल.
* अधिकाऱ्यांच्या गाड्या थेट स्थानकात.
* रेल्वे अधिकारयाकडूनच नियमाचे उल्लंघन.
पंढरपूर लाईव्हसाठी (सांगोला / शंतनु शेळके -)
गांधी
जयंतीच्या दिवशी सुरू झालेल्या स्वच्छता अभियानाचा अवघ्या काही दिवसांतच
बोजवारा उडाला. हे अभियान केवळ जाहिरातींपुरतेच मर्यादित राहिल्याचे दिसून
येत आहे. रेल्वे स्थानकांवर अस्वच्छता पसरवणा-या प्रवाशांविरोधात मध्य
रेल्वेने राबवलेली विशेष मोहीमही सपशेल फोल ठरली आहे.सांगोला रेल्वे
स्थानकांवर अस्वच्छता पसरवणा-या प्रवाशांविरोधात २० सप्टेंबर रोजी सुरू
करण्यात आलेल्या या अभियानांतर्गत रेल्वे तिकीट तपासनीसांमार्फत विशेष
मोहीम हाती घेण्यात आली. त्यात सांगोला रेल्वे अधिकाऱ्यांकडून अस्वच्छता
पसरवणा-या एकालाही पकडण्यात आले नसल्याने रेल्वेचे स्वच्छता अभियान
फसल्याचे प्रवाशांनी सांगितले.
देशभरात स्वच्छता अभियान सुरू झाल्यानंतर
रेल्वेनेही या अभियानासाठी उत्साहाने कंबर कसली. ‘एक कदम, स्वच्छता की ओर’
असा संदेश देणारे फलक रेल्वेने स्थानकांवर लावले. मात्र सांगोला रेल्वेचा
या अभियानात सहभाग दिसून आला असे कसे म्हणता येईल यांनी सहभाग घेतला असता
तर दंड आकारायला हवा होता.आणि जरी समजा राबवले तर ठीक आहे.त्यानंतर या
अभियानातून त्यांनी काढता पाय घेतल्याचे दिसून आले.पण स्वच्छता अभियानाला
एक महिना उलटूनही प्रवास करताना रेल्वे रुळाच्या दुतर्फा पडलेला कचरा आणि
घाण रेल्वेच्या स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाल्याचे दाखले देत
आहेत.
स्वच्छतेचा नगारा वाजवणाऱ्या सोलापूर रेल्वेच्या सांगोला स्थानकावरील
प्रसाधनगृहांमध्ये अस्वच्छता व दुर्गंधीचे साम्राज्य असून, प्लॅटफॉर्म नं. १
वरील प्रसाधनगृहाचा वापरच प्रवाशांनी बंद केला आहे कारण त्याला
स्थानकाच्या स्थापनेपासून टाळे आहेत तर २ नंबर प्लॅटफॉर्मवर शौचालायचं
नसल्याने प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी देशभरात राबवलेल्या स्वच्छता मोहिमेचा सांगोला रेल्वे
स्थानकांवर फुगा फुटला असून, मार्गावरील अन्य स्थानकांवरही
प्रसाधनगृहांबाबत बोंबच आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांतून तीव्र संताप
व्यक्त होत आहे. प्लॅटफॉर्मवरील प्रसाधनगृहास चक्क टाळे ठोकण्यात आले आहे.
त्यामुळे अनेक वर्षापासून या सुविधेपासून प्रवासी वंचित आहेत. ही सुविधा
प्रवाशांना उपलब्ध व्हावी, अशी मागणी होत आहे.
......................................................................................................................................................................
......................................................................................................................................................................भाषणबाजीपेक्षा काम करा कुमारसाहेब...
देशातील स्वच्छता मोहिमेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर रेल्वेच्या सांगोला स्थानकाच्या प्रवेशद्वारावर काहीतरी भाषण सादर केली होती. अस्वच्छतेमुळे आरोग्याला कसा धोका निर्माण होतो, याबाबत या भाषणातून प्रभावी प्रबोधन करण्यात आले होते. मात्र, हे प्रबोधन दिखाऊ होते की काय, ते कर्मचाऱ्यांसाठी नसून केवळ लोकांसाठीच होते काय, असा प्रश्न स्थानकातील प्रसाधनगृहांच्या अस्वच्छतेवरून विचारला जात आहे.
आपल्या जाहिराती पाठविण्यासाठी खालील ई-मेल आय डी वर संपर्क साधावा...
livepandharpur@gmail.com jhanjavat@gmail.com
मोबा. 8055434499, 8308838111, 8552823399
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
पंढरपूरचे
पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी
महाराष्ट्राच्या
कानाकोर्यातून विविध भागातील ताज्या बातम्या पाठविणेसाठी
प्रतिनिधी नेमणे आहेत...
या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्या
तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...
-संपादक :- भगवान गणपतराव वानखेडे
सा.झंझावात, पंढरपूर लाईव्ह
मोबा. 8055434499, 8308838111, 8552823399
कृपया इच्छूकांनी आपले अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या संपुर्ण बायोडाटासह
livepandharpur@gmail.com jhanjavat@gmail.com
या मेल आय डी वर ई-मेल करावेत.
या मेल आय डी वर ई-मेल करावेत.
ताज्या घडामोडी साठी बघत रहा....
www.pandharpurlive.com


0 Comments