पंढरपूर लाईव्ह
दिनांक : 17 जानेवारी, 2015मुंबई, दि. 17 : मुखेड विधानसभा मतदार संघात 13 फेब्रुवारी 2015 रोजी होणार्या पोटनिवडणुकीच्या मतदान व मतमोजणीच्या वृत्तांकनासाठी माध्यमांना प्राधिकारपत्रे देण्यात येणार असून या प्राधिकारपत्रांसाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 3 फेब्रुवारी 2015 आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.
निवडणूकीच्या मतदान, मतमोजणीचे वृत्तसंकलन, छायाचित्रणासाठी विविध प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींना भारत निवडणूक आयोगाची विहित प्राधिकारपत्रे प्रथम प्राप्त करणे आवश्यक आहे. अशी प्राधिकारपत्रे प्राप्त होण्याकरिता आयोगाने विहित केलेल्या निकषांची पूर्तता करणार्या इच्छुक प्रतिनिधींच्या नावांच्या शिफारसी आयोगाकडे पाठविण्याचा अंतिम दिनांक 3 फेब्रुवारी, 2015 असा आहे.
प्रसिध्दी माध्यमांच्या ज्या प्रतिनिधींना वरील पोटनिवडणूकीकरिता प्राधिकारपत्रे हवी असतील अशांनी आपली नांवे, पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रांच्या 2 प्रतीसह (मतदान/ मतमोजणी दोन्ही प्राधिकारपत्रे हवी असल्यास 3 प्रतींसह) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई यांनी 2 फेब्रुवारी 2015 पर्यंत पाठवावित. छायाचित्राशिवाय प्राप्त झालेली मागणी तसेच 3 फेब्रुवारी 2015 नंतर या कार्यालयात प्राप्त झालेली मागणी स्वीकारण्यात येणार नाही, असेही मुख्य निवडणुक अधिकार्यांनी कळविले आहे.
0000

0 Comments