पंढरपूर लाईव्ह
। पंढरपूर । प्रतिनिधी
शासनाने सन 2013 च्या आकृतीबंधाच्या परिपत्रकास स्थगिती देत शिक्षकेत्तर कर्मचार्यांना अतिरिक्त व ठरवता त्यांचे वेतन ऑनलाईन काढण्याचे मान्य करत विनाअनुदानित शाळा, तुकड्या व कनिष्ठ महाविद्यालयाच्या पुर्नमुल्यांकनाला स्थगिती देत येणार्या मार्चच्या अंदाजपत्रकात त्यांच्या वेतनाची तरतुद करू, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विविध संघटनांच्या पदाधिकार्यांना दिले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्र समन्वय समितीचे अध्यक्ष प्राचार्य सुभाष माने यांनी दिली.
शुक्रवार दि. 16 जानेवारी रोजी मंत्रालयात या बाबतची बैठक पार पडली. यावेळी आ. रामनाथ मोते, समितीचे अध्यक्ष प्राचार्य सुभाष माने, अरुण थोरात, विजय गायकवाड, रंगसिध्द दसाडे, ना.गो. गाणार, भगवानराव साळुंखे, शिक्षक परिषदेचे वेणुनाथ गुरु, शिवाजी खांडेकर, राज्याचे शिक्षण सचिव, प्राथमिक व माध्यमिकचे राज्य संचालक, टी.डी.आर. विजय बहाळकर यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
दि. 6 जानेवारी रोजी राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी काळ्या ङ्गिती लावून 1 दिवसाचे आंदोलन केले. 13 जानेवारी रोजी आंदोलनाच्या दुसर्या टप्प्यात शाळा बंद ठेवून एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. या संपाचा परिणाम म्हणून शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी समन्वय समितीच्या पदाधिकार्यांना चर्चेसाठी बोलावले होते.
दि. 6 जानेवारी रोजी राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी काळ्या ङ्गिती लावून 1 दिवसाचे आंदोलन केले. 13 जानेवारी रोजी आंदोलनाच्या दुसर्या टप्प्यात शाळा बंद ठेवून एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. या संपाचा परिणाम म्हणून शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी समन्वय समितीच्या पदाधिकार्यांना चर्चेसाठी बोलावले होते.
या चर्चेत सन 2013 च्या आकृतीबंधाच्या जी.आर. ला स्थगिती देण्याचे मान्य करत शिक्षकेत्तर कर्मचार्यांना अतिरिक्त न ठरवता त्यांचे पगार ऑनलाईन पध्दतीने काढण्याचे मान्य केले. तसेच सन 2013 च्या आकृतीबंधाच्या परिपत्रकात बदल करून चिपळुणकर समिती व आकृतीबंध यांच्यात ताळमेळ घालण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शालेय अधिकारी व शिक्षणमंत्री यांची समिती करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे सेवक संचामध्ये असणार्या ऋुटी तपासून तद्नंतर नवीन आर.टी.ई. कायदा यामध्ये थोडा बदल करून नंतर सेवक संच करण्याचे मान्य केले. विनाअनुदानित शाळा, तुकड्या व कनिष्ठ महाविद्यालयाच्या पुर्नमुल्यांकनास स्थगिती देऊन त्यांच्या वेतनाची तरतुद येणार्या अंदाजपत्रकात करून मार्चपर्यंत त्यांचे वेतन अदा करण्याचे मान्य केले असल्याचे प्राचार्य सुभाष माने यांनी सांगितले.
शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी 2 ङ्गेब्रुवारी रोजी राज्यातील शाळा बेमुदत बंद करण्याचे आंदोलन पाठीमागे घ्यावे असे सुचविले असता समन्वय समितीचे अध्यक्ष प्राचार्य सुभाष माने यांनी दि. 22 ते 25 जानेवारीपर्यंत या मागण्यांबाबतचा आदेश त्वरीत काढण्याची मागणी केली. हा आदेश न काढल्यास 2 ङ्गेब्रुवारीपासून राज्यातील शाळा बेमुदत बंद ठेवू. तसेच इ. 10 वी व 12 वीच्या परिक्षांवरही बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिला असता 25 जानेवारीपर्यंत याबाबतचा अध्यादेश काढण्याचे शिक्षणमंत्री तावडे यांनी मान्य केले.







0 Comments