पंढरपूर लाईव्ह
दि. 12 जानेवारी 2015
* पुण्याच्या साखर संकुलात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन...
* साखर आयुक्त कार्यालयाची मोठ्या प्रमाणात तोड फोड...
राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, दत्ता पाटील, विठ्ठल आबा, गणेश साळुंखे, जगदीश पाटील, जयेश महाडिक यांच्यासह 500 कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात.
* राजु शेट्टी यांच्या अटकेनंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पेटविली साखर आयुक्तांची गाडी.
पुणे दि.12 जानेवारी 2015
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे येथील साखर आयुक्त संकुलात संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी ऊसउत्पादक शेतकर्यांना एफआरपी नुसार ऊसदर मिळावा या मागणी साठी तीव्र आंदोलन छेडले. यावेळी कांही कार्यकर्त्यांनी साखर आयुक्त कार्यालयाची तोडफोड केली. यानंतर
वेगळा विचार करावा लागेल-राजु शेट्टी
याबाबत बोलताना स्वाभिमानीचे नेते राजु शेट्टी यांनी आपली भुमीका मांडताना सांगितले की, प्रशासन साखर कारखानदारांना सामील झालेले असून ऊसदराच्या प्रश्नाबाबत चाल-ढकल करत आहे. राज्यात आपल्या मित्रपक्षांचे सरकार आहे मात्र तरीही यावर तोडगा निघत नाही. याबाबत लवकरच वेगळा विचार करावा लागेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
एफआरपी नुसारच दर देणार- सहकारमंत्री चंद्रकांत पाटील
ऊस उत्पादक शेतकर्यांना त्यांच्या ऊसाचा दर हा एफआरपी नुसारच देण्यात येणार आहे. याबाबत शासन आग्रही आहे. मात्र यासाठीच्या कांही प्रोसेस असतात. त्यासाठी थोडा वेळ
लागेल. अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. सरकारी मालमत्तेचं नुकसान करु नये असेही ते म्हणाले.
लागेल. अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. सरकारी मालमत्तेचं नुकसान करु नये असेही ते म्हणाले.
राज्य व केंद्र सरकारने शेतकर्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत- शरद पवार
कारखान्यांकडे पैसे नसतील तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी पुढाकार घेवून शेतकर्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याची सद्यस्थितीत गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले आहे.
....................
....................








0 Comments