‘बळीराजा’चे जिल्हाध्यक्ष हळणवर खुनी हल्ला प्रकरण.....आरोपी अजुनही मोकाट....

पंढरपूर लाईव्ह

पंढरपूर लाईव्हच्या वृत्तानंतर  वाचकांच्या तीव्र प्रतिक्रिया

मात्र आरोपी अजुनही मोकाट....

‘बळीराजा’चे कारवाईसाठी निवेदन; कारवाई टाळण्यासाठी आरोपीची धावाधाव

पंढरपूर:- दि. 12 जानेवारी 2015

     बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली हळणवर यांच्यावर काल रविवारी ईश्‍वर वठार येथे खुनी हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यात जखमी झालेल्या माऊली हळणवर यांना 18 ाके पडलेले आहेत. माऊली हळणवर यंच्यावरील हल्ल्यानंतर कांही क्षणातच ‘पंढरपूर लाईव्ह’ ने याबाबत चे वृत्त प्रसिध्द केले. हे वृत्त पहाताच पंढरपूर लाईव्हच्या महाराष्ट्रातील विविध वाचकांच्या प्रतिक्रीया येण्यास प्रारंभ झाला. यामध्ये आरोपींना सोडू नका... तात्काळ अटक करा... शेतकर्‍यांचा आवाज दाबण्याचा हा निंदणीय प्रकार...  अशा संतप्त प्रतिक्रिया येण्यास प्रारंभ झाला. पंढरपूर लाईव्ह च्या फेसबुक पेजवर वाचकांनी आपला संताप व्यक्त लरुन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला असून या घटनेतील सर्व आरोपींना शोधून जेरबंद करण्याची मागणी केली आहे. मात्र   या प्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नसून घटनेचे गांभीर्य पहाता यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी विविध स्तरातून जोर धरत आहे.    


या प्रकरणातील सद्यस्थितीतील समजलेली माहिती अशी की, यातील आरोपी  प्रकाश सुखदेव चौगुले  व दगडू रोकडे हे अद्यापही मोकाटच असुन सदर प्रकरणातील आरोपी सुखदेव दगडु चौगुले हा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी स्वत:हुन दाखल झाला आहे.या आरोपीने स्वत:च आपल्या डोक्यात  दगड मारुन घेतला असल्याचा दावा काही प्रत्यक्षदर्शी करीत असुन अटकेची कारवाई टाळण्यासाठी आरोपीने बनाव रचल्याची चर्चा नारायण चिंचोली व ईश्‍वर वठार परिसरात होताना दिसुन येत आहे.

         या प्रकरणातील वरील तीन आरोपी विरोधात उस्मानाबाद, मंगळवेढा व पंढरपूर पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असुन अवैध सावकारीच्या माध्यमातून जमविलेल्या मायेतून अनेक वेळा पोलीस कारवाई टाळण्यात सदर आरोपी यशस्वी झाल्याची चर्चा या परिसरात होताना दिसुन येत आहे.वारंवार गुन्हेगारी वर्तन करणार्‍या या आरोपी विरोधात त्वरीत कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांमधुन व्यक्त केले जात असुन या आरोपीवर त्वरीत कारवाई करावी या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेसह विविध पक्षाचे  एक शिष्टमंडळ उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश जाधव यांना भेटले असुन याच बरोबर या घटनेचे गार्भीय ओळखुन मा.गृहमंत्री महाराष्ट्र यांनाही फॅक्सद्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे.
     यावेळी या शिष्टमंडळात शिवसेना तालुका प्रमुख संभाजी शिंदे, दलित स्वयंसेवक संघाचे श्रीमंत मस्के,श्रमिक मुकती दलाचे मोहन अनपट,भाजपा अनुसुचित जाती सेलचे अद्यक्ष अनिल बोराडे,माजी तालुकाध्यक्ष संतोष गाडे,बळीराजा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष नितिन बागल,संग्राम गायकवाड,तालुका अध्यक्ष पंडीत बागल,पंचायत समिती सदस्य आदींसह विविध पक्षाचे पदाधिकारी,ईश्‍वर वठार येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

....................

"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 12 जानेवारी 2015 रोजी  41,719  एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत   12 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2452 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....


पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा


                    ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती.

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

  आपला :-- भगवान गणपतराव वानखेडे (संपादक) 

   आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

 मोबा. नं.  8055434499  /  8308838111

 ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com

..........................

Post a Comment

0 Comments