गोवा येथे पार पडलेल्या 54 व्या अंकुर साहित्य संमेलनात रत्नप्रभा पाटील यांचा ‘माझे प्रेरणास्थान’ विषयावर परिसंवाद



पंढरपूर लाईव्ह(प्रतिनिधी)

54 वे अंकुर साहित्य संमेलन निसर्गरम्य अशा गोवा राज्यात बोरी ता. फोंडा  येथे उत्साहात साजरे झाले. या संमेलनात पंढरपूर येथील समाजसेविका व कवयत्री रत्नप्रभा पाटील यांनी आपल्या दोन कवीता सादर केल्या तर ‘माझे प्रेरणास्थान’ या विषयावर परिसंवाद साधला. दि. 27 /12/2014 ते दि. 28/12/2014 अशा दोन दिवसाच्या या
संमेलनात महाराष्ट्रातील विविध लेखक, कवी यांनी सहभाग नोंदवला. मराठीतील नामवंत कवी बा.भ. बोरकर उर्फ ‘‘बाकीबाब’’ यांचे गांव बोरी या छोट्याशा  गावात संमेलन साजरे झाले.  संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.माधवी कुंटे  या होत्या. तर उत्पादक माजी मंत्री रमाकांत स्वरुप प्रमुख अतिथी म्हणून सुनील सावकार, चित्रा क्षिरसागर, आमदारविष्णु सुर्या वाघ आदी मान्यवर होते.


प्रथम दिनी बा.भ. बोरकर यांच्या पुतळ्यापासून नवदुर्गा साहित्य नगरीपर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. संमेलन उद्घटनाचे औचित्य साधून अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. चर्चा, परीसंवाद, तेजशलाका प्रेरणास्थान, कवीसंमेलन अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना
अनुभवयास मिळाली. पंढरपूर येथील समाजसेविका व कवयत्री रत्नप्रभा पाटील यांनी देखील आपल्या दोन कविता सादर केल्या तर माझे प्रेरणास्थान या विषयावर संवाद साधला. पंढरपूरकरांच्या वतीने रत्नप्रभा पाटील यांनी सचिव शेकोकार व चित्रा क्षिरसागर यांचा सत्कार केला. रत्नप्रभा पाटील म्हणाल्या की, ‘‘विठ्ठलाची दिंडी संमेलनस्थळी निघाल्यानंतर माझे मन भारावून गेले आहे. ’’ पंढरपूरमध्ये  ‘शब्दांकूर’ साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याची इच्छा असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. पंढरपूरकरांच्या वतीने अंकुर साहित्य संमेलनाचे आयोजकांचे आभारही यावेळी त्यांनी मानले. डॉ.माधवी कुंटे यांच्या अध्यक्षीय भाषणाने संमेलनाचा समारोप झाला. गोमंतकीय रसिकांनी संमेलनास भरभरुन प्रतिसाद दिला.
.................................................................................

बघत रहा "पंढरपूर लाईव्ह"


"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 2 जानेवारी 2015 रोजी  37, 327  एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत

2 जानेवारी 2015 रोजी तब्बल 1874 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.


पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा


ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

 

आपला :-- भगवान वानखेडे (संपादक)

मोबा. नं.  8055434499  /  8308838111
 

           आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments