आनंद बनसोडेच्या ड्रीम इंजिनिअरिंग संकल्पनेअंतर्गत उपक्रम
सॉल्व्ह सिस्टीम व स्वप्नपूर्ती फाउंडेशनतर्फे सोलापूरच्या शिक्षणक्षेत्रात होणार ऑनलाइन क्रांती
पंढरपूर लाईव्ह(प्रतिनिधी)
सॉल्व्ह सिस्टीम व स्वप्नपूर्ती फाउंडेशन सोलापूर एज्युकेशन डॉट कॉम हे संकेतस्थळ येत्या 1 जानेवारी 2015 पासून सुरु करण्यात येणार आहे. सोलापुरातील शिक्षणविश्वाची माहिती जगाच्या कानाकोपरयापर्यंत पोहचवण्यासाठी या संकेतस्थळाचा उपयोग होणार आहे अशी माहिती आनंद बनसोडे व विनायक काटवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आतापर्यंत 4 खंडातील 4 सर्वोच्च शिखरे सर करून अनेक विक्रम करणार्या आनंद बनसोडे याने आपल्या स्वप्नपूर्ती फाउंडेशनतर्फे सोलापूर शिक्षणक्षेत्राला एव्हरेस्ट शिखराची उंची मिळवून देण्यासाठी www.solapureducation.com हे संकेतस्थळ सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आनंदच्या ड्रीम इंजिनिअरिंग प्रोजेक्टसाठी सॉल्व्ह सिस्टीम चे संचालक विनायक काटवे व अभिजीत नवगिरे यांनी या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. या संकेतस्थळामार्फत सोलापुरातील सर्व शिक्षणसंस्था, कॉलेज, शाळा, कोचिंग क्लासेस,आर्ट व डान्स क्लासेस, स्पर्धा-परीक्षा मार्गदर्शन केंद्र, वेगवेगळे शैक्षनिक व सांस्कृतिक कार्यक्रम आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. या संकेतस्थळात फक्त माहिती न देता तेथील शिक्षण कोणत्या दर्जाचे आहे, पुरवल्या जाणारया सुविधा, बोर्ड तसेच त्या शिक्षणसंस्थेला संपर्क करण्यासाठीची सर्व उपाययोजना यात केली गेलेली आहे. मेट्रोसिटी वगळता असे संकेतस्थळ असणारे सोलापूर हे देशातील प्रथम शहर असणार आहे.
आज सोलापूरमधील अनेकजण मुलांना शिक्षणासाठी परगावी ठेवतात. पण सोलापूरमध्ये अशा अनेक शिक्षणसंस्था व संस्थाचालक आहेत कि जे अहोरात्र इथे चांगल्या शिक्षणासाठी झटत आहेत. त्यांनी सोलापूरच्या शिक्षणाला गती येण्यासाठी व सर्वप्रकारचे शिक्षण येथे सुरु करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यांच्या कार्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय शिक्षण सध्या सोलापूरमध्ये उपलब्ध आहे. या संकेतस्थळामार्फत सोलापूरला एक एजुकेशन हब म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या संकेतस्थळा मध्ये सर्वच गोष्टी समाविष्ठ केल्यामुळे या संकेतस्थळाचा उपयोग प्ले ग्रुप शिक्षणापासून ते वयोवृद्धांना सोलापुरातील वेगवेगळ्या कार्यक्रमाची माहिती मिळण्यासाठी होईल.
आजपर्यंत सोशल इंजिनिअरिंग, पॉलिटिकल इंजिनीअरिंग असे शब्द ऐकले होते पण आनंद बनसोडे याच्या मनातून ड्रीम इंजिनीअरिंग ही संकल्पना निघाली असून या मार्फत प्रत्येकाच्या अंतर्मनातील स्वप्नांना सत्यात आणण्याचा विश्वास या प्रोजेक्टअंतर्गत रुजविला जाणार आहे. आनंद 9 वी मध्ये नापास झालेला असूनही सध्या तो फिजिक्स या विषयामध्ये संशोधन करत आहे. लहानपणापासून ढ असलो तरी स्वप्नाकडून- सत्याकडे जाण्याचा मार्ग शिक्षणामुळेच मिळाला यामध्ये माझ्या आई ची प्रेरणा महत्वाची आहे. आनंद आता हीच प्रेरणा सर्व नापास होणार्या तसेच अनेक विद्यार्थी व त्यांच्या मातानाही मुलांना स्वप्नांच्या मार्ग दाखवण्यासाठी कौन्सिलिग करणार आहे. यासाठी महिन्यातील काही दिवस अशा सर्वजणांना मार्गदर्शन करणार आहे. हा प्रोजेक्ट सर्व वयोगटासाठी असून त्याद्वारे नक्कीच प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यात बदल होईल असा विश्वास आनंदने व्यक्त केला.
या संकेतस्थळामध्ये आपली माहिती देण्यासाठी संस्थाचालकांनी, मुख्याद्यापाकानी, इन्स्टिट्यूट चालकांनी तसेच क्लासेस यांनी registersolapureducation.com या मेल वर किंवा 9604324264 / 9730277759 वर संपर्क करावा असे आवाहन सॉल्व सिस्टीम व स्वप्नपूर्ती फाउंडेशन यांनी केले आहे.पत्रकार परिषदेसाठी राजेश जगताप, अभिजीत नवगिरे, सुरेश नारायणकर उपस्थित होते.
संपर्क- 9604324264 / 8888856530 / 9021711622 / 9595552587
_______________________________________________________
बघत रहा "पंढरपूर लाईव्ह"
"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 1 जानेवारी 2015 रोजी 37, 197 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत
1 जानेवारी 2015 रोजी तब्बल 1861 अँन्ड्राँईड मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ... या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा
ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती
http://market.android.com/ search?q=pname%3Acom.wPandh arpurLive
आपला :-- भगवान वानखेडे (संपादक)
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com



0 Comments