कुळ कायद्यातील जमिनीसाठी मोहिमेचा लाभ घ्यावा तहसिलदार- पुनाजी कोथेरे

      
   पंढरपूर लाईव्ह(प्रतिनिधी)

   (दि.02):- मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम  43 नुसार कुळहक्काने मिळालेल्या जमिनींचा व्यवहार करतांना कुळकायद्यातील  संबंधीत तरतुदीमुळे कालापव्यय होत होता. यामुळे संबंधीत कब्जेदारास, खातेदारास  अशा जमिनींचा व्यवहार करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत  होता. या करिता शासनाने सदर बाब विचारात घेऊन कुळकाद्याच्या कलम 43 मध्ये सुधारणा केली असून, अशा जमिनींची खरेदी अथवा विक्री करण्यासाठी सबंधीतांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसिलदार श्री.पुनाजी कोथेरे यांनी केले.


कुळकायदा कलम 43 अंतर्गत नियंत्रीत सत्ता प्रकार ही शर्त 7/12  उता-या वरुन कमी करण्यासाठी ही मोहिम हाती घेतली आहे. यासाठी मंगळवेढा  तालुक्यातील खातेदारांनी संबंधित तलाठयांकडे त्वरीत अर्ज सादर करावेत. तालुक्यातील मंगळवेढा-670, आंधळगाव-355, भोसे-500, मारापूर-210, मरवडे- 373, बोराळे-290, हुलजंती-436 येथील मंडळातील कुळांना कुळकायद्यातंर्गत जमिनी मिळालेल्या आहेत. या कुळांच्या गावनिहाय याद्या गुरुवार दिनांक 8 जानेवारी 2015 रोजी सबंधीत तलाठी चावडीवर प्रसिध्द करण्यात येणार असल्याचेही तहसिलदार श्री.पुनाजी कोथेरे यांनी सांगितले. सबंधित खातेदारांनी तलाठयांकडे अर्ज सादर करतांना सारा आकारणीच्या 40 पट इतकी नजराणा रक्कम भरुन शर्त कमी करण्यासाठी तहसिल कार्यालय मंगळवेढा व सबंधीत गांव कामगार तलाठी यांच्याकडे अर्ज सादर करावेत. या मोहिमेचा सबंधीतांनी लाभ घ्यावा असे आवाहनही तहसिलदार पुनाजी कोथेरे यांनी केले आहे.

.................................................................................

बघत रहा "पंढरपूर लाईव्ह"


"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 2 जानेवारी 2015 रोजी  37, 327  एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत

2 जानेवारी 2015 रोजी तब्बल 1874 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.


पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा


ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

 


आपला :-- भगवान वानखेडे (संपादक)

मोबा. नं.  8055434499  /  8308838111
 

  आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com


Post a Comment

0 Comments