6 जानेवारी 2015 रोजी पंढरीत पार पडलेल्या ‘पत्रकारदिन’ कार्यक्रमातील क्षणचित्रे...


पंढरपूर लाईव्ह

आद्यपत्रकार ‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर 

यांचा जयंती दिन 6 जानेवारी 2015  

‘पत्रकार दिन’ यावर्षी पंढरीच्या इतिहासात प्रथमच मोठ्या स्वरुपात साजरा झाला. पंढरपूरातील श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील उंबरे व पंढरपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिराज उबाळे यांच्या  प्रयत्नातून ‘पत्रकार मित्र सत्कार समिती, पंढरपूर’ ची  निर्मिती झाली. यामध्ये जयसिंग पाटील, दिलीप कोरके, हिंमत आसबे,  माजी नगरसेवक किरणराज घाडगे , नागेश ताठे -देशमुखआदींनी मोठ्या परिश्रमाने आणि दुरदृष्टीने कार्यक्रमाचे देखणे आयोजन केले.

यावेळी  उपस्थित मान्यवरांनी आपली  मनोगते व्यक्त केली. प्रामुख्याने पत्रकार गृहनिर्माण संस्थेचा आणि पत्रकार भवनाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे अभिवचन दिले.



मोठ्या दिमाखात पार पडलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार भारतनाना भालके , प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमुख्यमंत्री तथा खासदार विजयसिंह मोहिते पाटील,  आमदार दीपकआबा साळुंखे, मोहोळचे आ.रमेश कदम, नगराध्यक्षा सौ.साधना नागेश भोसले, ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा.डॉ. द.ता.भोसले ,सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, दलित स्वयंसेवक संघाचे दिलीप देवकुळे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट  आदी प्रमुख उपस्थित होते..
या कार्यक्रमामध्ये पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सत्कार सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, पेन व डायरी देवून करण्यात आला. कार्यक्रमासाठी आकर्षक व भव्य स्टेज उभारण्यात आलेले होते. सनई चौघड्यांच्या नादमाधुर्याने कार्यक्रमात  बहार आली.

यावेळी कांही मनोरंजनात्मक कार्यक्रमही पार पडले. येथील संस्थापक भारत माळी यांच्या सावित्रीबाई फुले चित्रकला व कला महाविदयालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट नृत्याविष्काराने रंगत आणली. सूत्रसंचालन श्‍वेता हुल्ले व विक्रम बिस्कीटे यांनी केले. यानंतर बंडा जोशी, वंदन नगरकर यांचा हास्यकल्लोळ व संतोष चोरडिया यांच्या नृत्याविष्कार कार्यक्रम सादर करण्यात आला.

या कार्यक्रमातील कांही विशेष  क्षणचित्रे खास ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या वाचकांसाठी...






‘पत्रकार मित्र’ सत्कार समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार झाला तेे क्षण...

यावेळी मनोरंजनात्मक कलाविष्कार सादर झाले ती क्षणचित्रे... 

यावेळी सर्व पत्रकार, व मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्रं सौजन्य:- श्री.शिवाजी (लल्लू) यादव, ईसबावी, पंढरपूर

.............................................................................................................................................

........................................................................................

..............................................................................................

"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 10 जानेवारी 2015 रोजी  40,398  एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत   10 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2261 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा

                    ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

  आपला :-- भगवान गणपतराव वानखेडे (संपादक) 

मोबा. नं.  8055434499  /  8308838111

   आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com

................................................


Post a Comment

0 Comments