पंढरपूर लाईव्ह
दि. 11 जानेवारी 2015
पंढरपूर- येथील सामाजिक कार्यकर्त्या रत्नप्रभा पाटील यांना सोलापूर स्थित सावित्रीबाई फुले शिक्षण व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वर्ष 2015 चा ‘सावित्री-जिजाऊ लेकी सन्मान-2015’ हा पुरस्कार प्रदान करुन दि. 10 जानेवारी 2015 रोजी गौरविण्यात आले.

शिवस्मारक, सोलापूर येथे मुंबईचे फारुक नाईकवाडे यांच्या हस्ते व सोलापूरच्या माजी महापौर नलिनी चंदेले यांचे अध्यक्षतेखाली सौ. रत्नप्रभा चांगदेव पाटील यांच्यासह अश्विनी सानप, मंगला कोल्हे, शांता मरगूर, उषा शिंदे, प्रमिला चोरगी, पल्लवी बुधाराम, निलम जाधव आदी 9 महिलांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देवून ‘सावित्री-जिजाऊ लेकी सन्मान-2015’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी यांनी सांगितले की, यावर्षी समाजातील विविध सेवा क्षेत्रातील 9 महिलांना ‘सावित्री-जिजाऊ लेकी सन्मान-2015’ या पुरस्काराने सन्मानीत करत असून ‘स्त्रीशक्ती हीच राष्ट्रशक्ती’ हे ब्रीद घेवून आमची ही संस्था सामाजिक व शैक्षणीक क्षेत्रात वाटचाल करीत आहे.प्रमुख पाहुण्यांनी ‘ड्रीम फााउंडेशन’ व सर्व 9 पुरस्कारप्राप्त महिलांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी आपल्या सत्कारास उत्तर देताना रत्नप्रभा पाटील म्हणाल्या, ‘‘हा सत्कार माझा नसून जिजाऊ-सावित्रीच्या सर्व लेकींचा आहे. पुरस्कार मिळाल्यामुळे आनंद तर झालाच मात्र महिला सबलीकरणासाठी आणखी जोमाने काम करण्यास स्फुर्ती व प्रेरणा मिळाली.’’
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना नलिनी चंदेले म्हणाल्या, ‘समाजात स्त्रीला प्रतिष्ठा मिळाल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही.’’
भतगुणकी व महादेव जंबगी यांनी या सत्कार सोहळ्याचे उत्तम आयोजन केले होते. कार्यक्रमास अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
........................................................................................
..............................................................................................
"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 10 जानेवारी 2015 रोजी 40,398 एवढी आहे...
"पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना
झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत 10 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2261 अँन्ड्राँईड मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या
मोबाईलमध्ये घेतले ... या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून
विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे
आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन
क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही
यामध्ये आपणास पहायला मिळेल....
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा

ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी
खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही
नम्र विनंती
http://market.android.com/ search?q=pname%3Acom.wPandh arpurLive
आपला :-- भगवान गणपतराव वानखेडे (संपादक)
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com





0 Comments