पंढरपूर लाईव्ह
दि. 11-01-2015समाजात फार्मासिष्टची भूमिका अत्यंत महत्वाची -डॉ. संदिप गवळी
पंढरपूर:- ‘ समाजात फार्मासिष्टचे कार्य हे डॉक्टरांनंतर महत्वाची भूमिका बजावते. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील दुवा असणार्या फार्मासिष्टने औषधांची कमी-जास्त मात्रा यांचे महत्व देखील रूग्णांना पटवून दयावे.’ असे प्रतिपादन डॉ. संदिप गवळी यांनी केले.
श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इंन्स्टिटयुट संचलित फार्मसी कॉलेजमध्ये आयोजिलेल्या ‘फार्मा विक’च्या निमित्ताने पंढरपूर शहर पोलिस स्टेशन मध्ये भव्य रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी डॉ. गवळी भावी फार्मासिष्ट तथा फार्मसी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. दीपप्रज्वलनानंतर बी.फार्मसीचे प्रभारी प्राचार्य डॉ. रविंद्र कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात ‘फार्मसी विक’ आयोजिण्याचा हेतू सांगितला. पंढरपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक गोपाळ चावडीकर म्हणाले, ‘गरीब रूग्ण डॉक्टरांकडे उपचाराला जाण्याअगोदरही कदाचित औषधांबाबत फार्मासिष्टकडून माहिती घेत असतो. त्याकरीता फार्मासिष्टनी बी.फार्मसी व डी.फार्मसी शिक्षण घेतल्यानंतर औषध विक्री दुकानात ज्येष्ठ फार्मासिष्टकडून औषध विक्रीबाबतचे अधिक अनुभव घ्यावेत.’ असे सांगुन रॅलीचे स्वागत केले.पुढे बोलताना प्रमूूख पाहुणे डॉ.गवळी म्हणाले, ‘शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांंनी औषध निर्माण करणार्या कारखान्यांना भेटी देवून त्याची सखोल माहिती जाणून घ्यावी. शैक्षणिक अभ्यासक्रमांपेक्षाही अनुभव अत्यंत महत्वाचा असतो. त्यातून प्रत्यक्ष औषधे व त्यांचा दर्जा आदी बारीक सारीक गोष्टी हाताळता येतात. याकरीता ग्राहक अथवा रूग्ण यांच्याशी संभाषण कौशल्याच्या माध्यमाने औषधांचे महत्व पटवून देता येईल.’ त्यानंतर नवीन एस. टी. स्टॅड, भादुले चौक, गांधी रोड, चौफाळा, शिवाजी चौक, आदी मार्गाने स्टेशन रोडवर रॅलीची सांगता केली. दरम्यान रॅली मध्ये विद्यार्थ्यांनी ‘प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर’, ‘नॉट जस्ट अ फार्मसी बट अ फॉमिली’, ‘मुली वाचवा, देश वाचवा’ ‘झिंदाबाद झिंदाबाद, कॅप्सुल पॉवर झिंदाबाद’ असे एक ना अनेक गगनभेदी घोषणा देत पंढरपूर शहरात आरोग्याविषयी जनप्रबोधन करत होते. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी प्रचांड गर्दी केली होती तर रॅलीत विद्यार्थ्यांची प्रचंड मोठी रांग असल्यामुळे ते व्यवस्थीत पणे पार पाडण्यासाठी शहर पोलिस स्टेशनच्या वाहतूक पोलिसांनी देखील संपुर्णपणे सहकार्य करत होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल, पोलिस अधिकारी वर्ग, पोलिस कर्मचारी, डि.फार्मसीचे प्रभारी प्राचार्य शिरीष नागणसुरकर, एन.एस.एस.चे प्रा.रामदास नाईकनवरे, सांस्कृतिक प्रतिनिधी जोगेश ओहाळ यांच्यासह बी.फार्मसी व डि.फार्मसीचे प्राध्यापक वर्ग व एन.एस.एस.च्या 100 विद्यार्थ्यासह 415 विद्यार्थी रॅलीत सहभाग झाले होेते. रॅली प्रमुख प्रा. व्ही.व्ही.मोरे व प्रा. डी.जे.यादव यांनी शिस्तबध्द व नियोजनात्मक रॅलीची व्यवस्था केली होती. सुत्र संचालन प्रतिभा स्वामी व वैभव सावंत यांनी केले तर आभार विद्यार्थी प्रतिनिधी आनंद लवटे यांनी आभार मानले.
......................................................................................
..............................................................................................
"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 10 जानेवारी 2015 रोजी 40,398 एवढी आहे...
"पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना
झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत 10 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2261 अँन्ड्राँईड मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या
मोबाईलमध्ये घेतले ... या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून
विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे
आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन
क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही
यामध्ये आपणास पहायला मिळेल....
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा

ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी
खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही
नम्र विनंती
http://market.android.com/ search?q=pname%3Acom.wPandh arpurLive
आपला :-- भगवान गणपतराव वानखेडे (संपादक)
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com





0 Comments