बळीराजा शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षावर तिघांचा खुनी हल्ला

पंढरपूर लाईव्ह

दि. 11 जानेवारी 2015

पंढरपूर:-     बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली हळणवर यांच्यावर ईश्‍वर वठार येथे खुनी हल्ला झाला असुन या हल्ल्यामागचे कारण मात्र अज्ञात असुन या हल्ल्यामागे राजकीय षडयंत्र असल्याची पंढरपूर तालुक्यात होत असुन हल्लखोरांनी माऊली हळणवर यांना मारहाण करताना‘तू लई पुढारपण करतो काय? तुला खलास करुन टाकील अशी धमकी दिल्याची फिर्याद तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली असुन माऊली हळणवर यांना जनकल्याण रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

         माउली हळणवर हे शेतकरी संघटनेचे एक लढाऊ व झुंजार कार्यकर्ते म्हणुन जिल्ह्यात प्रसिध्द असून त्यांच्या कार्याची दखल घेत बळीराजा शेतकरी संघटनेने त्यांची नुकतीच सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.या हल्ल्याबाबत माऊली हळणवर यांनी दाखल केलेल्या  फिर्यादी नुसार माउली हळणवर हे आपल्या ट्रॅक्टरचे डिझेल नेण्यासाठी पंढरपूरहूण नारायण चिंचोली येथे येवुन ते बसस्टॉप वर थांबले असताना सदर आरोपीने तेथे त्यांना शिवीगाळ केली असता काही उपस्थितांनी आरोपींना समजुत घालुन घरी पाठवीले मात्र त्यानंतर ईश्‍वर वठार येथील आपल्या घराकडे जात असताना ईश्‍वर वठार-अजनसोंड रस्त्यावर प्रकाश सुखदेव चौगुले ,सुखदेव दगडु चौगुले व दगडू रोकडे या आरोपींनी फिर्यादीची मोटार सायकल अडवून तू लई पुढारपण करतो काय? तूला खलासच करतो असे म्हणत लोखंडी गजाने डोक्यात व शरीरावर फिर्यादीस व रामदास हळनवर यांना मारहाण केली.यामध्ये माउली हळणवर यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली असुन त्यंाना पंढरपूरातील जनकल्याणर हॉस्पिटल मध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून या प्रकरणाचा तपास पो.हे.कॉ.विजय गायकवाड हे करीत आहेत. 

..................................................................................

..............................................................................................

"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 10 जानेवारी 2015 रोजी  40,398  एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत   10 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2261 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा

                    ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

  आपला :-- भगवान गणपतराव वानखेडे (संपादक) 

मोबा. नं.  8055434499  /  8308838111

   आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com

................................................



Post a Comment

0 Comments