पंढरपूर लाईव्ह
पुणे, ता. १० : ‘‘ध्येयवादी, प्रशिक्षित युवक राजकारणात आले, तर राजकारणाची प्रतिमा बदलेल. भारतीय लोकशाहीला सक्षमबनवण्यासाठी कारभारात स्वच्छ आणि पारदर्शकता आणावी लागेल. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि पत्रकारिता या लोकशाहीच्या चार स्तंभांसह समाजाने एकत्रित येऊन प्रयत्न केल्यास एकविसाव्या शकतात भारत जगाचे नेतृत्व करेल,’’ असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले.
मॅगसेसे पुरस्कार विजेते आणि जलतज्ज्ञ डॉ.
राजेंद्र सिंग, राज्याचे माजी उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे, केंद्रीय युवक
कल्याण मंत्रालयाचे सचिव राजीव गुप्ता, पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे,
उद्योजक नानिक रूपानी, डॉ. अभय फिरोदिया यांच्यासह विश्वशांती केंद्र
(आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड,
भारतीय छात्र संसद फाउंडेशनचे संस्थापक आणि संसदेचे संकल्पक व समन्वयक
प्रा. राहुल विश्वनाथ कराड, माईर्सचे विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, माईर्स
एमआयटीचे कार्यकारी संचालक प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटी स्कूल ऑङ्ग
बिझनेसचे संचालक (ग्रुप कॅप्टन) प्रा. डी. पी. आपटे आदी मान्यवर उपस्थित
होते.
नितीन गडकरी म्हणाले, ‘‘सगळ्याच पक्षांत काही चांगले लोक आहेत. मात्र, प्रत्येकजण परिपूर्ण नसतो. त्यामुळे सक्षमनेतृत्त्वाचा प्रश्न सर्वांसमोरच आहे. सुशिक्षित, प्रामाणिक आणि ध्येयवादी तरुणांनी राजकारणात सक्रीय सहभाग घेतल्यास आणि मतदानाच्या रुपाने समाजातील प्रत्येकाने सहभागी झाल्यास राजकारणातील वाईट गोष्टी आपोआप दूर होतील. नवे ज्ञान, तंत्रज्ञान आणि तत्त्वज्ञान आत्मसात करीत विकासाभिमुख दृष्टिकोन ठेवला, तर राजकीय प्रगल्भता येईल.’’
राजेंद्र सिंग म्हणाले, ‘‘एकेकाळी पाणी मोफत मिळायचे. मात्र, आज त्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. आज देश दुष्काळासारख्या गंभीर समस्येला सामोरा जात आहे. ही परिस्थिती बदलायची असेल, तर पाण्याच्या सुरक्षिततेवर विचार करण्याची गरज आहे. स्वच्छतेअभावी नद्यांतील पाणी वापरण्यायोग राहिलेले नाही. ही परिस्थिती बदलायची असेल, तर नैसर्गिक साधनांचा योग्य वापर करण्याबरोबरच वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करावी लागेल.’’
राजेश टोपे म्हणाले, ‘‘सक्षम, समृद्ध भारतासाठी युवकांमध्ये जबाबदारीची जाणीव व्हायला हवी. समाजातील प्रत्येक घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी धोरण आखून त्याप्रमाणे कामकरण्याची गरज आहे. सध्या शिक्षणाचा दर्जा पाहता शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल करायला हवेत. ज्ञानाचा योग्य वापर आणि स्व-अध्ययन यावर अधिक भर दिल्यास देशाच्या प्रगतीस उपयुक्त ठरेल.’’
रेणुका चौधरी म्हणाल्या, ‘‘मातृभूमी, मातृभाषा अशा संकल्पना आपल्याकडे आहेत. मात्र, स्त्रीला अजूनही म्हणावा तितका वाव दिला जात नाही. आजही स्त्री-भ्रूण हत्या, स्त्रीयांवरील अत्याचार, शेतकर्यांच्या आत्महत्या असे अनेक गंभीर प्रश्न आहेत. महिला केवळ मनोरंजनाची किंवा घरात राबण्याची वस्तू नसून, तीदेखील क्षमताधिष्ठित, स्पर्धात्मक आणि गुणवत्ताधारक आहे.’’
किरण खेर यांनी अभिनय ते राजकारण असा जीवनप्रवास उलगडला. त्या म्हणाल्या, ‘‘चांगले कामकरणार्या नेत्यांकडे पाहिल्यानंतर राजकारणात आले. पक्षातील वरिष्ठांनी वेळोवेळी प्रेरणा दिली. त्याबरोबरच समाजासाठी कामकरण्याचे स्वप्न पूर्ण करता आले. मात्र, हे करताना प्रामाणिकपणा, मूल्ये कधीही सोडली नाहीत. ज्यांनी मला निवडून दिले, त्या भागातील लोकांच्या विकासासाठी मी माझे कुटुंब सोडून तिकडे स्थायिक झाले आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपापल्या कार्यक्षेत्रात समाजाभिमुख कामकेल्यास समाजातील अनेक प्रश्न सुटतील.’’
प्रा. राहुल कराड म्हणाले, ‘‘राजकारणाचे शिक्षण ही आजची गरज बनली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आयआयटी, आयआयएमयांसारख्या अभ्यासक्रमाच्या धर्तीवर आयआयएल म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशीप सुरु करावेत. त्यातून नेतृत्वाचे आणि स्वच्छ राजकारणाचे धडे द्यावेत.’’
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी छात्र संसदेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. राजीव गुप्ता यांनी आपले विचार मांडले. डॉ. अभय फिरोदिया यांनी समारोपाचे भाषण केले. यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. निलिमा शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. विश्वशांती प्रार्थना व राष्ट्रगीताने कार्मक्रमाची सुरूवात होऊन पसामदानाने सांगता झाली.
जातीयवादाची समस्या गंभीर
असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, ‘‘समाजातून जातीभेद, धर्मभेद दूर व्हावेत,
अशा घोषणा आपण करतो. मात्र, निवडणुकांत त्याचाच वापर केला जातो, ही
दुर्दैवी बाब आहे. जातीपातीच्या राजकारणात चांगल्या प्रतिमेच्या लोकांना
निवडून आणण्याचे सर्वच पक्षांसमोर आव्हान आहे. निवडून आलेल्या लोकांनी
अहंकाराला लांब ठेवत समाजाचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्याची गरज
आहे.’’नितीन गडकरी म्हणाले, ‘‘सगळ्याच पक्षांत काही चांगले लोक आहेत. मात्र, प्रत्येकजण परिपूर्ण नसतो. त्यामुळे सक्षमनेतृत्त्वाचा प्रश्न सर्वांसमोरच आहे. सुशिक्षित, प्रामाणिक आणि ध्येयवादी तरुणांनी राजकारणात सक्रीय सहभाग घेतल्यास आणि मतदानाच्या रुपाने समाजातील प्रत्येकाने सहभागी झाल्यास राजकारणातील वाईट गोष्टी आपोआप दूर होतील. नवे ज्ञान, तंत्रज्ञान आणि तत्त्वज्ञान आत्मसात करीत विकासाभिमुख दृष्टिकोन ठेवला, तर राजकीय प्रगल्भता येईल.’’
राजेंद्र सिंग म्हणाले, ‘‘एकेकाळी पाणी मोफत मिळायचे. मात्र, आज त्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. आज देश दुष्काळासारख्या गंभीर समस्येला सामोरा जात आहे. ही परिस्थिती बदलायची असेल, तर पाण्याच्या सुरक्षिततेवर विचार करण्याची गरज आहे. स्वच्छतेअभावी नद्यांतील पाणी वापरण्यायोग राहिलेले नाही. ही परिस्थिती बदलायची असेल, तर नैसर्गिक साधनांचा योग्य वापर करण्याबरोबरच वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करावी लागेल.’’
राजेश टोपे म्हणाले, ‘‘सक्षम, समृद्ध भारतासाठी युवकांमध्ये जबाबदारीची जाणीव व्हायला हवी. समाजातील प्रत्येक घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी धोरण आखून त्याप्रमाणे कामकरण्याची गरज आहे. सध्या शिक्षणाचा दर्जा पाहता शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल करायला हवेत. ज्ञानाचा योग्य वापर आणि स्व-अध्ययन यावर अधिक भर दिल्यास देशाच्या प्रगतीस उपयुक्त ठरेल.’’
रेणुका चौधरी म्हणाल्या, ‘‘मातृभूमी, मातृभाषा अशा संकल्पना आपल्याकडे आहेत. मात्र, स्त्रीला अजूनही म्हणावा तितका वाव दिला जात नाही. आजही स्त्री-भ्रूण हत्या, स्त्रीयांवरील अत्याचार, शेतकर्यांच्या आत्महत्या असे अनेक गंभीर प्रश्न आहेत. महिला केवळ मनोरंजनाची किंवा घरात राबण्याची वस्तू नसून, तीदेखील क्षमताधिष्ठित, स्पर्धात्मक आणि गुणवत्ताधारक आहे.’’
किरण खेर यांनी अभिनय ते राजकारण असा जीवनप्रवास उलगडला. त्या म्हणाल्या, ‘‘चांगले कामकरणार्या नेत्यांकडे पाहिल्यानंतर राजकारणात आले. पक्षातील वरिष्ठांनी वेळोवेळी प्रेरणा दिली. त्याबरोबरच समाजासाठी कामकरण्याचे स्वप्न पूर्ण करता आले. मात्र, हे करताना प्रामाणिकपणा, मूल्ये कधीही सोडली नाहीत. ज्यांनी मला निवडून दिले, त्या भागातील लोकांच्या विकासासाठी मी माझे कुटुंब सोडून तिकडे स्थायिक झाले आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपापल्या कार्यक्षेत्रात समाजाभिमुख कामकेल्यास समाजातील अनेक प्रश्न सुटतील.’’
प्रा. राहुल कराड म्हणाले, ‘‘राजकारणाचे शिक्षण ही आजची गरज बनली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आयआयटी, आयआयएमयांसारख्या अभ्यासक्रमाच्या धर्तीवर आयआयएल म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशीप सुरु करावेत. त्यातून नेतृत्वाचे आणि स्वच्छ राजकारणाचे धडे द्यावेत.’’
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी छात्र संसदेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. राजीव गुप्ता यांनी आपले विचार मांडले. डॉ. अभय फिरोदिया यांनी समारोपाचे भाषण केले. यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. निलिमा शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. विश्वशांती प्रार्थना व राष्ट्रगीताने कार्मक्रमाची सुरूवात होऊन पसामदानाने सांगता झाली.
माईर्स एमआयटी स्कूल ऑङ्ग गव्हर्नमेंट व भारतीय छात्र संसद फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या भारतीय छात्र संसदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अभिनेत्री आणि खासदार किरण खेर यांना मैत्रेयी पुरस्काराने, तर राज्यसभा खासदार रेणुका चौधरी यांना गार्गी पुरस्काराने गडकरी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
.........................................................................................
....................................................................
"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 10 जानेवारी 2015 रोजी 40,283 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत
10 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2250 अँन्ड्राँईड मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ... या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून
विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे
आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन
क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही
यामध्ये आपणास पहायला मिळेल....
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा
ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती
http://market.android.com/ search?q=pname%3Acom.wPandh arpurLive
आपला :--
भगवान वानखेडे (संपादक)
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com

0 Comments