आ. भारतनाना भालके यांनी केली श्रीविठ्ठलाच्या गाभार्‍याची व मंदिर परिसराची पहाणी

पंढरपूर लाईव्ह

दि. 13-1-2015 रोजी श्री विठ्ठल मंदिराच्या गाभार्‍यात वरील बाजुस बसवलेला एक लाकडी वासा अचानक पडला... मात्र सुदैवाने श्रीविठ्ठलाच्या मुर्तीला कांही झाले नाही...या घटनेची गंभीर दखल घेवून आ.भारतनाना भालके यांनी आज दि. 14 जानेवारी रोजी तातडीने मंदिराच्या गाभार्‍याची व इतर भागाची पहाणी करुन मंदिर समितीच्या प्रशासनाला योग्य त्या सुचना केल्या.

यावेळी आ.भारतनाना भालके यांनी सांगितले की, मंदिराचा गााभारा हा फारच पुरातन आहे.. श्रीरुक्मिणी
मातेचा गाभारा हा श्रीविठ्ठलाच्या गाभार्‍यापेक्षा आकाराने मोठा आहे. तसेच श्रीविठ्ठलाच्या शिखरापेक्षा
श्रीरुक्मिणीमातेचे शिखराचे बांधकाम नवे आहे. श्रीविठ्ठलाच्या पुरातन शिखराची, गाभार्‍याची व मंदिराच्या इतर पुरातन बांधकामाची माहिती पुरातत्व विभागाच्या जाणकारांना बोलावून त्यांच्या सल्ल्याने आवश्यक त्या ठिकाणी डागडुजी करुन घ्यावी.. गाभार्‍यात जर शक्य झाले तर वरच्या भागात जो पत्रा आहे ते काढून त्या ऐवजी चांदीचा पत्रा किंवा कमी वजनाच्या साहित्याचा वापर करुन कांही दुरस्ती कराव्यात. जेणेकरुन असा एखादा अपघात घडला तर भाविकांना किंवा इतर कुणाला इजा होऊ नये. असे ही आपण सांगितल्याचे आ. भालके यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. वरील सर्व बाबींबाबत आ.भारतनाना भालके यांनी संबंधीत अधिकार्‍यांना निदर्शनास आणून दिल्या व लवकरात लवकर ही कामे मार्गी लावावीत असे  सुचवले. 

"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 14 जानेवारी 2015 रोजी  42,974 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत   14 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2605 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....


पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा


                    ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती.

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

  आपला :-- भगवान गणपतराव वानखेडे (संपादक) 

   आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

 मोबा. नं.  8055434499  /  8308838111

 ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com

..........................




Post a Comment

0 Comments