अजित मेंडगुळे यांचे महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेत यश
पंढरपूर लाईव्ह
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेत येथील अजित विजयकुमार मेंडगुळे यांना भरघोस यश मिळाले असून त्यांची नियुक्ती पंढरपुरातीलच लघुसिंचन (जलसंधारण) विभाग सोलापूर अंतर्गत उपविभाग मध्ये सहायक अभियंता श्रेणी २ पदी झाले असून त्यांनी नुकताच आपल्या कार्याचा पदभार स्वीकारला आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण विध्यामंदिर बार्शी येथे, माध्यमिक शिक्षण बार्शीच्या सुलाखे हायस्कूल मधून तर बारामती येथिल विद्या प्रतिस्ष्ठानेीजं अभियांत्रिकीच्या सिव्हील विभागातून पदवी प्राप्त केली.
यंदाच्या वर्षी पदव्युत्तर पदवीच्या(एम.इ.) स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असतानाच ही स्पर्धा परीक्षा दिली. त्यांनी या परीक्षेसाठी अहोरात्र परिश्रम घेवून पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. अजित यांना आई, वडील, मित्र व मामा बाळासाहेब गुळबिले यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. पुढे यु.पी.एस.सी.स्पर्धा परीक्षा देण्याचा मानस आहे. जिद्द, अफाट परिश्रम घेण्याची तयारी आणि त्याच बरोबर योग्य मार्गदर्शन यामुळेच यश मिळाल्याचे ते सांगतात. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्धल सर्वत्र कौतुक होत आहे.छायाचित्र - अजित विजयकुमार मेंडगुळे
-----------------------------------------
बघत रहा "पंढरपूर लाईव्ह"
"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 8 जानेवारी 2015 रोजी 39,438 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत
8 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2135 अँन्ड्राँईड मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ... या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा
ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी
खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही
नम्र विनंती
http://market.android.com/ search?q=pname%3Acom.wPandh arpurLive
आपला :--
भगवान वानखेडे (संपादक)
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com






0 Comments