पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी)-

 
  आपण रस्त्यावरून बिनधास्त वाहने चालवितो आणि नाहक अपघाताला बळी पडतो. साहजिकच आपल्याबरोबरच दुसर्याचे जीव व वाहन धोक्यात आणतो. याकरिता आपण आपल्या वाहनांवर ताबा ठेवून, शिस्तबद्ध वाहन चालविल्यास आपल्या बरोबरच दुसर्यांची व त्यांच्या वाहनांचेही नुकसान टाळू शकतो.याकरिता आपण आपल्या वाहनांचे वेग नियंत्रणात ठेवून स्वतःची व साहजिकच समोरून येणार्‍या वाहनांची व वाहन धारकांची काळजी घ्यावी असे आवाहन सोलापूर जिल्हा सहायक मोटारवाहन निरीक्षक जयश्री झिने यांनी केले.

     उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 26 व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सहा.मोटारवाहन निरीक्षक झिने ह्या वाहनांच्या नियमावर विध्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करत होत्या. प्रास्तविकात अधिष्ठाता डॉ.एस.एम.मुकणे यांनी रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या आयोजनाचा हेतू सांगून पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी व्यासपिठावर मोटार वाहन निरीक्षक निरंजन पुनसे, संस्थेचे अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल,डिप्लोमा पोलिटेक्निकचे प्राचार्य एन.डी. मिसाळ,पत्रकार राजीव मोरे, पालक संघाचे एस.पी. कुलकर्णी, विष्णुपंत वास्ते, प्रा.एस.एम.बागल उपस्थित होते.पुढे जिने यांनी अपघात कसे व कोणत्या कारणाने घडतात.याची सविस्तर माहिती देवून रस्त्यावर वाहन चालविताना घाव्याची काळजी व अपघाताची कारणे सांगून अपघात कसे टाळता येतील? याबाबत लहान लहान चुका देखील जीवघेणी कशा ठरतात याचे विवेचन केले आणि विद्यार्थ्यांनी देखील वाहन चालविताना काळजी घेणार असल्याचे या निमित्ताने सांगितले. 
छायाचित्र-श्री विठ्ठल अभियांत्रिकीत रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन झाले यावेळी मार्गदर्शन करताना सोलापूर जिल्हा सहायक मोटारवाहन निरीक्षक जयश्री झिने,सोबत डावीकडून अधिष्ठाता  डॉ.एस.एम.मुकणे, मोटार वाहन निरीक्षक निरंजन पुनसे, संस्थेचे अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल, प्राचार्य एन.डी. मिसाळ,पत्रकार राजीव मोरे, विष्णुपंत वास्ते,पालक संघाचे एस.पी.कुलकर्णी आदी.
...

"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 14 जानेवारी 2015 रोजी  42,745 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत   14 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2581 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....


पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा


                    ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती.

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

  आपला :-- भगवान गणपतराव वानखेडे (संपादक) 

   आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

 मोबा. नं.  8055434499  /  8308838111

 ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com

..........................